ETV Bharat / bharat

West Bengal News : मृत्यूचा दाखला देताना सरपंचाकडून 'प्रगती अन् यश प्राप्त व्हावे अशा शुभेच्छा! विरोधकांची टीका - मृत्यूचा दाखला देताना प्रगती व्हावे अशा शुभेच्छा

पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूरच्या पाथरा येथे सत्ताधारी असलेले तृणमुल काँग्रेस ग्रामपंचायतीच्या प्रमुखाने मृत्यू प्रमाणपत्र जारी केले आहेत. हे जारी करताना मृतांना तुमची प्रगती आणि तुमच्या यशाची शुभेच्छा अशा भावना व्यक्त केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे. तसेच. यावर विरोधी पक्षांनी जारदार टीका करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर सत्ताधारी पक्षाने अनवधानाने ही चूक झाली असे कबूल केले आहे.

West Bengal News
प्रगती अन् यश प्राप्त व्हावे अशा शुभेच्छा
author img

By

Published : Apr 8, 2023, 7:51 PM IST

पश्चिम मिदनापूर : पश्चिम बंगालच्या पाथरा ग्रामपंचायतीमध्ये मृताच्या कुटुंबीयांना मृत्यू प्रमाणपत्र देताना पंचायत प्रमुखाने मृत व्यक्तीला समृद्धी आणि यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. येथील मृत तारकनाथ डोलोईच्या कुटुंबीयांनी मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पश्चिम मिदनापूरमधील कोटियाली पोलीस स्टेशन अंतर्गत टीएमसीच्या पाथरा ग्रामपंचायतीच्या पंचायत प्रमुख सारथी सिंह यांच्याशी संपर्क साधला आणि माहिती घेतली.

मी त्यांच्या मृत्यूमध्ये समृद्धी आणि यशाची कामना करतो : मृताच्या नातेवाईकांना गावप्रमुखाकडून मृत्यू प्रमाणपत्र देताना गडबड झाली. यामध्ये दिवंगतांच्या प्रगती व यशासाठी प्रधान यांनी शुभेच्छा दिल्या. हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रमाणपत्रात लिहिले आहे, 'तारकनाथ डोलोई हे आमच्या गावचे कायमचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र आहे. 1 जानेवारी 2022 रोजी त्यांचे निधन झाले. आता ते या जगात नाहीत. मी त्या व्यक्तीला चांगले ओळखते. मी त्यांच्या मृत्यूमध्ये समृद्धी आणि यशाची कामना करतो असे शब्द यामध्ये वापरले आहेत.

मृत्यू मदतीचे प्रमाणपत्र पंचायत प्रमुखाने दिले : या पत्रावर मुख्य तारीखही इंग्रजी आणि बंगाली यांच्या मिश्रणात लिहिली आहे. त्या तारखेतही चूक झाल्याचे कळले आहे. तर, दुसरीकडे विरोधकांनी पंचायत प्रमुखांना अप्रशिक्षित आणि अशिक्षित म्हणत सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली आहे. मुळात कृषक बंधू योजनेंतर्गत मृत्यू मदतीचे प्रमाणपत्र पंचायत प्रमुखाने दिले होते. सदर प्रमाणपत्र जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावे लागेल. त्यानंतर प्रशासनाच्या अंतिम मंजुरीनंतरच आर्थिक मदत मिळते.

स्वाक्षरी करण्यापूर्वी मजकूर तपासला नाही : या प्रकरणारवर भाजपचे प्रवक्ते अरुप दास म्हणाले, 'अशिक्षितांसारखे राज्य चालवणारे हे कोण आहेत?' तसेच, त्यांनी या घटनेसाठी पंचायत प्रमुखांपेक्षा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले आहे. टाऊन ईस्ट एरिया कमिटीचे सचिव सोमनाथ चंद्र म्हणाले, 'ज्या निरक्षर लोकांना मृत्यूचा दाखला कसा लिहायचा हे देखील माहित नाही, त्यांना निरक्षर म्हणण्याशिवाय दुसरी भाषा नाही, त्यांच्या विरोधात मी आणखी काय बोलू.' मात्र, ही अनावधानाने झालेली चूक असल्याचे सांगून सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी झटकले आहे. याबाबत जिल्हा संघटन अध्यक्ष सुजॉय हाजरा म्हणाले, 'पंचायत प्रमुखांनी घाईघाईत चूक केली. ती नकळत झालेली चूक होती. दुसरीकडे ग्रामपंचायत प्रधान सारथी सिंह यांनी घाईघाईने सही केली आणि स्वाक्षरी करण्यापूर्वी मजकूर तपासला नसल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : Balasaheb Thackeray Ayodhya : बाळासाहेब ठाकरे कधीच अयोध्येला गेले नाहीत; वाचा काय आहे नेमके कारण

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.