ETV Bharat / bharat

Karnataka MLA On Rape : 'त्या' वक्तव्यावर कर्नाटकच्या आमदाराने मागितली माफी

विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस आमदारांनी सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे वेळ मागीतली. (Congress MLA Rude Statement 2021) तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार केआर रमेश कुमार यांनी एक टिप्पणी केली. ते म्हणाले 'तुमची स्थिती या म्हणीसारखी आहे की तुम्ही बलात्कार थांबवू शकत नसाल तर झोपा आणि मजा करा' असे म्हणाले. त्यावरून सर्वत्र मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर त्यांनी ट्वीक करून माफी मागीतली आहे.

कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार

author img

By

Published : Dec 17, 2021, 9:47 AM IST

Updated : Dec 17, 2021, 2:08 PM IST

कर्नाटक (बेंगळुरू) - कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार (Congress MLA Ramesh Kumar) यांनी गुरुवारी विधानसभेत बलात्कारावर लाजिरवाणी टीप्पणी केली. या टीप्पणीने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Karnataka MLA Ramesh Kumar Rude Statement) बेळगावी येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बोलताना रमेश कुमार यांनी सभापतींशी बोलताना ही टीप्पणी केली. ते म्हणाले 'तुमची स्थिती या म्हणीसारखी आहे, की तुम्ही बलात्कार थांबवू शकत नसाल, तर झोपा आणि मजा करा' असे म्हणाले. त्यावरून सर्वत्र मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर त्यांनी ट्वीक करून माफी मागीतली आहे.

मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत

कुमार यांनी असे वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वीही त्यांनी बलात्काराच्या मुद्द्यावर असेच वक्तव्य केले होते. गुरुवारी राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीवर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते. मात्र, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी वेळ देण्यास टाळण्याचा प्रयत्न करत होते. 'तुम्ही जे काही ठरवाल ते मी हो म्हणेन. (Congress MLA Rude Statement) मी विचार करत आहे की तुम्ही परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,' असे सभापतींनी आमदारांना सांगितले.

सभागृहात उपस्थित असलेले वक्ते आणि इतर काही नेते हसताना दिसले

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे आमदार रमेश कुमार यांनी सांगितले की, 'एक म्हण आहे की जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो तेव्हा झोपा आणि मजा करा. (Congress MLA Rude Statement In Karanataka Assembly) तुम्ही अगदी त्याच स्थितीत आहात.' दरम्यान, दुर्दैवी गोष्ट म्हणजे रमेश कुमार यांच्या या असभ्य वक्तव्यावर सभागृहात उपस्थित असलेले वक्ते आणि इतर काही नेते काहीच प्रतिक्रिया देताना दिसले नाही. कुमार यांनी यापूर्वी (२०१८-१९) मध्येही विधानसभेचे अध्यक्ष असताना अशी वादग्रस्त टिप्पणी केली होती.

मुलींची माफी मागितली पाहिजे

विधानसभा अध्यक्ष असताना रमेश कुमार यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या महिला सदस्यांसह आमदारांनी अधिवेशनात त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला होता. अशा घृणास्पद आणि निर्लज्ज वर्तनासाठी सभागृहाने संपूर्ण स्त्रीत्वाची प्रत्येक माता, बहीण आणि मुलींची माफी मागितली पाहिजे, असे आमदार सौम्या रेड्डी यांनी त्यावेळी म्हटले होते.

माझीही अवस्था अशीच झाली आहे

फेब्रुवारी (२०१९)मध्ये रमेश कुमार यांनी, माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी झाली आहे. बलात्कार फक्त एकदाच झाला. तिथे सोडले असते तर ते संपले असते. बलात्कार झाल्याची तक्रार केल्यावर आरोपीला तुरुंगात टाकले जाते. हे कसे, कधी आणि किती वेळा घडले याची चौकशी त्यांचे वकील किंवा ईश्वरप्पा (तेव्हाचे आमदार आणि आता भाजपाचे मंत्री) यांच्यासारखे करतात असे म्हटले होते. खटल्याच्या शेवटी, पीडिता म्हणेल की उलटतपासणी दरम्यान बलात्कार प्रत्यक्षात एकदाच झाला होता. परंतु, कोर्टात अनेक वेळा झाला. माझीही अवस्था अशीच झाली आहे, असे धक्कादायक वक्तव्य रमेश कुमार यांनी केले होते.

हेही वाचा - बैलगाडा शर्यतीचा पुन्हा उडणार धुराळा, जाणून घ्या बैलगाडा मालकांच्या लढ्यासह नेत्यांच्या प्रतिक्रिया

Last Updated : Dec 17, 2021, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.