हैदराबाद - श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी जमीन खरेदी प्रकरणात घोटाळा झाला असल्याचा करण्यात आलेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. खरेदीबाबत झालेले आरोप हे संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि राजकारण करण्याच्या हेतुने करण्यात आले आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आतापर्यंत जितक्या जमीन व्यवहारांची खरेदी झाली आहे, ती सर्व खुल्या बाजारभावाने आणि कमीतकमी किमतीने करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रभारी आणि राज्यसभा सदस्य संजय सिंहने रविवार रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून जमीन खरीदच्या नावावर कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, प्रभु श्रीराम मंदिराच्या नावावर हजारो कोटीरुपये वर्गणी गोळा करणारे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये जमीन खरेदीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे.
आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टीनंतर आता काँग्रेसनेही आरोप केला आहे की, भगवान रामाच्या नावाने दान गोळा करून त्यामध्ये घोटाळा केला जात आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून आरोप केला आहे. हे रामा हे कसले दिवस आले आहेत. तुमच्या नावावर वर्गणी करत त्यामध्ये घोटाळा केला जात आहे. हे निर्लज लुटारू आता लोकांच्या श्रद्धेची विक्री करत आहेत. मात्र प्रश्न हा आहे की 'दोन कोटीमध्ये खऱेदी केलेली जमीन 10 मिनटात ‘राम जन्मभूमी’ ट्रस्टलाला 18.50 कोटी रुपयांना कशी विकली, यावरून असे वाटत आहे कंसाचे राज्य आहे आणि चौहुबाजूला रावण आहे. अशी टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
याच आरोपावरून रामजन्मभूमी ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की रामजन्मभूमी ट्रस्टकडून होणारी सर्व खरेदी विक्रीचे काम आपआपसात संवाद आणि पूर्ण सहमतीने केले जातात. सहमती मिळाल्यानंतरच सहमतीपत्रावर सही केली जाते. तसेच सर्व प्रकारची खरेदी प्रक्रियेची फी स्टॅम पेपर, हे सर्व खरेदी ऑनलाईन केली जात असल्याचेही चंपतराय यांनी यावेळी स्पष्ट केले.
सहमती पत्राच्या आधारावर जमिनीचे खरेदी व्यवहार पूर्ण केले जातात. त्यानुसारच खरेदीच्या बदल्यातील रक्कम विक्रेत्याच्या खात्यामध्ये ऑनलाईन पाठवली जाते. तसेच ज्या भूखंडावरून घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. तो भूखंड रेल्वे स्थानकाच्या जवळ आणि मोक्याच्या ठिकाणी आहे. तसेच राम जन्मभूमी ट्रस्टने आतापर्यंत जेवढ्या काही जमिनी खरेदी केल्या आहेत, त्या खुल्या बाजारातील किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केल्या आहेत.
नमूद केलेली जमीन खरेदी करण्यासाठी, उपस्थित विक्रेत्यांनी वर्षांपूर्वी ज्या किंमतीवर करार केला होता, त्यांना ती जमीन 18 मार्च 2021 रोजी विकली. त्यानंतर ट्रस्टबरोबर करार करण्यात आला. मात्र, सध्या जे आरोप केले जात आहेत, ते नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी केले जात आहेत. हे पूर्णता राजकीय दृष्टीकोणातून आरोप केले जात असल्याचेही चंपतराय यांनी म्हटले आहे.