सनातन धर्मात अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे. अधिक मासातील कालाष्टमी मंगळवारी 8 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. या दिवशी भगवान शंकराचे ज्वलंत रूप असलेल्या बाबा कालभैरवची पूजा केली जाते. या दिवशी बाबा कालभैरवाची खऱ्या मनाने पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते, पापे दूर होतात. आत्मविश्वास वाढतो. असे मानले जाते. त्याच वेळी, व्यक्तीला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे.
जीवनात स्थिरता येते : ज्योतिषी आणि अध्यात्मशास्त्रज्ञांच्या मते, कालाष्टमीला भगवान कालभैरव आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. कालाष्टमीचा उपवास अकाली मृत्यू टाळतो आणि दीर्घायुष्य देतो. कालाष्टमीच्या उपवासाने जीवनात स्थिरता येते. यासोबतच कामात येणारे अडथळे दूर होतात. कालभैरवाची पूजा करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी.
कालाष्टमी मुहूर्त
- अष्टमी तिथी सुरू होते 8 ऑगस्ट 2023 (मंगळवार) सकाळी 04:14 वाजता.
- अष्टमी तिथी समाप्त होते: 9 ऑगस्ट 2023 (बुधवार) सकाळी 03:52 वाजता.
पूजा पद्धत : या दिवशी सकाळी लवकर उठावे. स्नाना नंतर स्वच्छ कपडे घालावे. घरातील मंदिर स्वच्छ करून दिवा लावावा. मंदिरात भगवान शिवाच्या रुद्र अवताराची किंवा काळभैरवाची मूर्ती स्थापित करावी. भगवान शंकराला दूध, दही, मध, पंचामृत, बेलपत्र, धतुरा, खीर किंवा हलवा अर्पण करावे.या दिवशी महामृत्युंजयाचा जप करावा असे सांगितले जाते.
हे काम करू नये : कालाष्टमीच्या दिवशी कोणाचिही टीका किंवा निंदा करू नका. घरात वादाचे वातावरण निर्माण करू नका. नकारात्मक भाषा वापरू नका. कोणालाही खोटे आश्वासन देऊ नका. कालाष्टमीच्या दिवशी भैरव मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते.
व्रताला विशेष महत्व : हिंदू धर्म ग्रंथात कालाष्टमी व्रताला विशेष महत्व दिले गेले आहे. पंचांगानुसार कृष्ण पक्षातील अष्टमीच्या तिथीला हे व्रत पाळले जाते. हा दिवस कालभैरवाला समर्पित आहे. कालभैरव हा शिवाचा अवता मानला जातो. याच दिवशी मंगळागोरीचे व्रतही पाळले जाते. अशा स्थितीत त्याचे महत्व अधिकच वाढते या दिवशी भेरवाची स्तुती केल्यामुळे प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळते, तसेच देव क्षणात जीवनातील अडथळे दुर करतो अशा भक्तांना विश्वास आहे.