ETV Bharat / bharat

Vasu Baras : शेतकरी जीवनात वसुबारसचे महत्व काय आहे, जाणून घ्या

महाराष्ट्रात वसुबारस (Vasu Baras) या सणाच्या दिवशी संपूर्ण राज्यातील शेतकरी वसुबारस हा विशेष सण साजरा करतात. दरवर्षी याच दिवशी शेतकरी कामधेनू स्वरूपा गौमातेची देशभरात ठिकठिकाणी पूजा करण्याची (what is importance of Vasu Baras life of a farmer) परंपरा आहे.

Vasu Baras
वसुबारस
author img

By

Published : Oct 14, 2022, 2:15 PM IST

महाराष्ट्रात दिवाळी एक दिवस आधी म्हणजेच द्वादशीपासून सुरू होते. या दिवशी संपूर्ण राज्यातील शेतकरी वसुबारस (Vasu Baras) हा विशेष सण साजरा करतात. या दिवशी समुद्रमंथनातून कामधेनू प्रकट झाली असे मानले जाते. आणि दरवर्षी याच दिवसाच्या स्मरणार्थ शेतकरी कामधेनू स्वरूपा गौमातेची देशभरात ठिकठिकाणी पूजा करण्याची (what is importance of Vasu Baras life of a farmer) परंपरा आहे.

वासरासहित गायीची पूजा : या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.

शेतकऱ्यांच्या जीवनातील वसुबारसेचे महत्त्व : शेतकऱ्यांच्या जीवनात गाय आणि वासरांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. हा सण मुळात गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी गाय आणि वासरू यांची संयुक्त पूजा केली जाते. पूजेदरम्यान त्यांना गव्हापासून बनवलेले पदार्थ खायला दिले जातात.

वसुबारस साजरा करण्यामागचे कारण : या दिवशी घरातील गोधनाची पूजा करतात. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता, वासरासोबतच गायीची पूजा करतात. या दिवसापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.

काय आहेत प्रथा : या दिवशी गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.

गोधन पूजेचे महत्व : भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही गोधनाची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची परंपरा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.