ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल: वडील आणि काकांकडून ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.. आईनेच केली तक्रार - अल्पवयीन मुलीवर वडील काकांकडून अत्याचार

पश्चिम बंगालमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा वर्षांपासून तिच्या वडिलांसह काकाने लैंगिक अत्याचार केला ( Minor girl sexually abused by father and uncle ) आहे. आईनेच याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे.

West Bengal: Minor girl sexually abused by father and uncle
पश्चिम बंगाल: वडील आणि काकांकडून ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.. आईनेच केली तक्रार
author img

By

Published : Jul 19, 2022, 7:05 PM IST

डायमंड हार्बर (पश्चिम बंगाल): एका सात वर्षांच्या मुलीवर गेल्या सहा वर्षांपासून तिचे वडील आणि काका सातत्याने बलात्कार करत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला ( Minor girl sexually abused by father and uncle ) आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी दोघांना सोमवारी रात्री कोलकात्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली तेव्हा ही घटना समोर आली.

सासू करत होती समर्थन : "ती फक्त दीड वर्षांची होती तेव्हापासून ते हे करत आहेत. मी जेव्हा त्यांना थांबवायला गेलो तेव्हा ते माझ्यावर शारीरिक अत्याचार करतात आणि माझ्यासमोर लहान मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवतात. माझी सासू देखील समर्थक होती. माझा नवरा आणि माझा दीर. मी असहाय होते. इतक्या दिवसांनी मला तक्रार करण्याची संधी मिळाली. पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील, अशी आशा आहे," असे मुलीच्या आईने औपचारिकपणे तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

प्रौढ चित्रपट पाहायला लावले : तथापि, पोलीस सूत्रांनी पुष्टी केली की, इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी असलेली मुलगी तिचे वडील आणि काका यांच्याकडून सतत लैंगिक अत्याचाराला बळी पडली होती. "त्यांनी मुलीला प्रौढ चित्रपट पाहण्यास भाग पाडले. मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे आम्ही पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे," असे डायमंड हार्बर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

दीड वर्षाची असल्यापासून शोषण : पीडितेच्या आईने आरोप केला आहे की, तिचे वडील आणि काका दीड वर्षांची असल्यापासून तिचे लैंगिक शोषण करत होते. या अत्याचाराविरोधात अल्पवयीन मुलीच्या आईने वारंवार अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न केले. हा गुन्हा थांबवण्याचे अनेक प्रयत्न करूनही तिच्या मुलीवर दिवसेंदिवस लैंगिक अत्याचार होत असल्याचे तिला सहन होत नव्हते.

तक्रार घेण्यासही नकार : "काही आठवड्यांपूर्वी मी डायमंड हार्बर महिला पोलिस स्टेशनमध्ये गेले होते पण त्यांनी कोणतीही तक्रार घेण्यास नकार दिला. मी असहाय्य होते आणि काय करावे हे मला कळत नव्हते. मला भीती वाटत होती कारण जर त्यांना कळले तर ते मला आणि माझ्या मुलीला मारतील. नंतर, मी स्वयंसेवी संस्था आणि महिला संघटनांशी संपर्क साधला आणि त्यांनी मला पोलीस ठाण्यात नेले आणि औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली. त्यांना आता अटक करण्यात आली आहे," आई म्हणाली.

आरोपी अटकेत : अखेर पीडित मुलीच्या आईला महिला संघटनेच्या देखरेखीखाली डायमंड हार्बर पोलिस ठाण्यात मुलाचे वडील आणि काकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात यश आले. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास डायमंड हार्बर पोलीस करत आहेत.

हेही वाचा : नात्याला काळिमा.. घरात एकटी पाहून सासऱ्याचा सुनेवर बलात्कार, आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.