कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नुकतचं विधानसभा निवडणुका झाल्या असून ममता बॅनर्जी यांचे पुन्हा सरकार स्थापन झाले आहे. मात्र, सरकारसमोर अडचणी वाढताना दिसत आहेत. राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला आहे. पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
'ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांचा प्रचार करतांना निवडणूक आयोगाने तैनात केलेल्या केंद्रीय फौजांविरोधात भडक विधाने केली आहेत. याचा परिणाम म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी केंद्रीय दलाच्या जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री अशा घटनांना जबाबदार आहेत', असे दिलीप घोष यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरात लूटमार, हिंसाचार आणि दरोडे सुरू झाले आहेत आणि त्या पाठोपाठ दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला करून अनेक टीएमसी नेत्यांनी राज्यात हिंसाचार निर्माण केला आहे. अनेक लोक ज्यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. ते आता बेघर झाले आहे. यताला मुख्यमंत्री बॅनर्जी जबाबदार आहेत, असेही घोष यांनी एफआयआर म्हटले आहे. बॅनर्जी यांनी अनेकदा भारतीय संविधानाचा भंग केल्याचेही त्यांनी म्हटलं.
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव -
विधानसभा निवडणुकीतील तृणमूल काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर ममता बॅनर्जींनी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. 200 हून अधिक जागा मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला केवळ ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर डाव्या पक्षांचा गड समजला जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
हेही वाचा - गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नाही, मीही पिते, मला कोरोना झाला नाही: प्रज्ञासिंह ठाकूर