कोलकाता - पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या म्हणजे एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजलं. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल.
पश्चिम बंगाल, पहिला टप्पा - 30 जागा
2 मार्च रोजी निवडणुकीचे नोटिफिकेशन निघणार
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख -9 मार्च
नामनिर्देशन अर्जांची पडताळणी - 10 मार्च
अर्ज मागे घेण्याची तारीख - 12 मार्च
मतदान - 27 मार्च
निकाल - 2 मे 2021 रोजी
पाच राज्यात विधानसभा निवडणूक
पश्चिम बंगाल, दूसरा टप्पा -
5 मार्च रोजी निवडणुकीचे नोटिफिकेशन निघणार
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 12 मार्च
नामनिर्देशन अर्जांची पडताळणी - 15 मार्च
अर्ज मागे घेण्याची तारीख - 17 मार्च
मतदान - 1 एप्रिल
निकाल - 2 मे 2021 रोजी
पश्चिम बंगाल, तिसरा टप्पा - 31 जागा
12 मार्च रोजी निवडणुकीचे नोटिफिकेशन निघणार
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 19 मार्च
नामनिर्देशन अर्जांची पडताळणी - 20 मार्च
अर्ज मागे घेण्याची तारीख - 22 मार्च
मतदान - 6 एप्रिल
निकाल - 2 मे 2021 रोजी
पश्चिम बंगाल, चौथा टप्पा - 44 जागा
16 मार्च रोजी निवडणुकीचे नोटिफिकेशन निघणार
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 23 मार्च
नामनिर्देशन अर्जांची पडताळणी - 24 मार्च
अर्ज मागे घेण्याची तारीख - 26 मार्च
मतदान - 10 एप्रिल
निकाल - 2 मे 2021 रोजी
पश्चिम बंगाल, पाचवा टप्पा - 45 जागा
23 मार्च रोजी निवडणुकीचे नोटिफिकेशन निघणार
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 30 मार्च
नामनिर्देशन अर्जांची पडताळणी - 31 मार्च
अर्ज मागे घेण्याची तारीख - 3 एप्रिल
मतदान - 17 एप्रिल
निकाल - 2 मे 2021 रोजी
पश्चिम बंगाल सहावा टप्पा - 43 जागा
26 मार्च रोजी निवडणुकीचे नोटिफिकेशन निघणार
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 3 एप्रिल
नामनिर्देशन अर्जांची पडताळणी - 5 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख - 7 एप्रिल
मतदान - 22 एप्रिल
निकाल - 2 मे 2021 रोजी
पश्चिम बंगाल, सातवा टप्पा - 36 जागा
31 मार्च रोजी निवडणुकीचे नोटिफिकेशन निघणार
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 7 एप्रिल
नामनिर्देशन अर्जांची पडताळणी - 8 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख - 12 एप्रिल
मतदान - 26 एप्रिल
निकाल - 2 मे 2021 रोजी
पश्चिम बंगाल आठवा टप्पा - 35 जागा
31 मार्च रोजी निवडणुकीचे नोटिफिकेशन निघणार
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 7 एप्रिल
नामनिर्देशन अर्जांची पडताळणी - 8 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख - 12 एप्रिल
मतदान - 29 एप्रिल
निकाल - 2 मे 2021 रोजी
भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना -
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. अमित शहा यांनी मिशन बंगालचे लक्ष्य निश्चित केले. ममता बॅनर्जीही यावेळी भाजपाला गांभीर्याने घेतलं आहे. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
प. बंगालमध्ये राजकीय स्थिती काय?
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध तृणमूल असा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. गेली निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाने 211 जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व पश्चिम बंगालमधील आपली सत्ता राखली. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आलं नाही. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यात यावेळी तरी भाजप यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.