ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालमध्ये दुसऱया टप्प्यात 80.79 टक्के मतदानाची नोंद

author img

By

Published : Apr 1, 2021, 6:42 AM IST

Updated : Apr 1, 2021, 8:03 PM IST

West Bengal Assembly Election 2nd phase of polling LIVE Updates
LIVE Updates : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा..

20:02 April 01

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात 80.79 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

17:47 April 01

सायंकाळी 5.22 वाजेपर्यंत 79.53 टक्के मतदान

16:27 April 01

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात दुपारी 3.40 पर्यंत 71.07 टक्के मतदान

15:15 April 01

ईव्हीएम चालत नसल्याचा महुआ मोइत्रा यांचा दावा

टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी जवळपास 150 ईव्हीएम मशीन चालत नसल्याचा दावा केला आहे. 

15:15 April 01

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. बाहेरील लोक स्थानिकांना मतदान करण्यापासून रोखत असल्याची तक्रार त्यांनी राज्यपालांना केली. 

13:36 April 01

दुपारी एक वाजेपर्यंत ५८.१५ टक्के मतदान..

पश्चिम बंगालमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत ५८.१५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

13:24 April 01

ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये दाखल..

ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये दाखल..

तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये दाखल झाल्या आहेत.

13:13 April 01

नंदीग्राममधील मतदान केंद्रे भाजपाच्या ताब्यात; डेरेक ओब्रायन यांचे निवडणूक आयोगाला पत्र

नंदीग्राममधील काही मतदान केंद्रे भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहेत, अशा आशयाचे पत्र तृणमूल नेते डेरेक ओब्रायन यांनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे. मतदान केंद्र क्रमांक 6,7,49,27,162,21,26,13,262,256,163 आणि 20 याठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते ईव्हीएम रुमचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत असेही ओब्रायन म्हणाले.

13:11 April 01

नंदीग्राममध्ये माध्यमांवर हल्ला..

नंदीग्रामच्या कमलापूरमध्ये माध्यम प्रतिनिधींच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला 'एका ठराविक' समुदायाच्या, पाकिस्तानी लोकांनी केला आहे. 'जय बांग्ला' हे घोषवाक्य बंगालसाठी नसून, बांगलादेशसाठी आहे असे मत सुवेंदु अधिकारी यांनी व्यक्त केले.

11:38 April 01

कांचननगरमध्ये भाजपा कार्यकर्त्याला मारहाण - सुवेंदु अधिकारी

शमसाबादच्या कांचन नगर परिसरात एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. तसेच, नंदीग्राममध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या झालेल्या मृत्यूला अमृल नावाची व्यक्ती जबाबदार आहे. पोलिस याबाबत कारवाई करत आहेत. इतर ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे, असे भाजपा नेते सुवेंदु अधिकारी यांनी सांगितले.

11:37 April 01

सकाळी अकरापर्यंत ३७.४२ टक्के मतदान..

राज्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत ३७.४२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

11:27 April 01

तृणमूल कार्यकर्त्यांवर रस्ता बंद केल्याचा आरोप..

घाटल येथील सीपीआयएम कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे, की तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रस्ता बंद केला आहे. कोणीही मतदान करण्यासाठी पोहोचू नये यासाठी हे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर सुरक्षा दलांनी याठिकाणी पोहोचत रस्त्यावरील अडथळा दूर केला.

11:15 April 01

ममता बॅनर्जी वाघीण; भाजपाला पुरुन उरतील - संजय राऊत

ममता बॅनर्जी या वाघीण असून, विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पुरुन उरतील असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज व्यक्त केले. पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

10:34 April 01

पाथरप्रतिमामध्ये आढळला सीआरपीएफ जवानाचा मृतदेह..

पाथरप्रतिमामध्ये एका मतदान केंद्रामध्ये सीआरपीएफ जवानाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. कमल गंगोपाध्याय असे या जवानाचे नाव होते. या घटनेचा मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नाही.

10:32 April 01

भाजपाच्या मंडल अध्यक्षाला पोलिसांनी घेतले ताब्यात..

डेब्रामधील मतदान केंद्रावर झालेल्या गदारोळानंतर पोलिसांनी भाजपाचे मंडल अध्यक्ष मोहन सिंह याला ताब्यात घेतले आहे.

09:56 April 01

भाजपा पोलिंग एजंटला मारहाण, तन्मय घोष यांची गाडीही फोडली..

भाजपा पोलिंग एजंटला मारहाण, तन्मय घोषची गाडीही फोडली..

केशपूरमधील मतदान केंद्र क्रमांक १७३ वरील भाजपाच्या पोलिंग एजंटला मारहाण करण्यात आली आहे. या एजंटला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. यासोबतच भाजपा नेते तन्मय घोष यांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली आहे. हे सर्व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

09:52 April 01

डेब्रामधील मतदान केंद्रावर गदारोळ..

डेब्रामधील मतदान केंद्रावर गदारोळ..

डेब्रामधील मतदान केंद्रावर गदारोळ झाला आहे. पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बाहेरुन गुंड मागवल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. आम्ही इथंच राहणारे लोक आहोत, त्यामुळे इथे गोंधळ घालून आम्हाला काय मिळेल? असे स्थानिक म्हणाले. याठिकाणी भाजपाच्या भारती घोष आणि तृणमूलचे हुमायून कबीर यांच्यामध्ये मुख्य लढत आहे.

09:40 April 01

नंदीग्राममध्ये आढळला भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह

नंदीग्रामच्या पूर्व भेकुटियामध्ये एका भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. एका शौचालयात त्याचा मृतदेह मिळाला आहे. या कार्यकर्त्याला तृणमूल कार्यकर्त्यांकडून धमक्या येत होत्या अशी माहिती भाजपा नेत्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

09:35 April 01

सकाळी नऊ वाजेपर्यंत १३.१४ टक्के मतदान

सकाळी नऊ वाजेपर्यंत एकूण १३.१४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

09:12 April 01

तृणमूलच्या गुंडांनी पोलिंग एजंटला मतदान केंद्रावर जाऊ दिले नाही, भाजपाचा आरोप

नौपाडाच्या बूथ क्रमांक २२वर असलेल्या भाजपाच्या पोलिंग एजंटला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आत जाऊ दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. डेब्रा मतदारसंघातील उमेदवार भारती घोष यांनी हा आरोप केला आहे. या पोलिंग एजंटला तृणमूलच्या १५० कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचे सांगण्यात येत आहे.

08:35 April 01

मोदींनी केले मतदानाचे आवाहन..

West Bengal Assembly Election 2nd phase of polling LIVE Updates
पंतप्रधान मोदींनी केले मतदानाचे आवाहन..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करत हे आवाहन केले.

08:32 April 01

सुवेंदु अधिकारी यांनी केले मतदान..

सुवेंदु अधिकारी यांनी केले मतदान..

भाजपा उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी आज सकाळी मतदान केले. यावेळी त्यांनी नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.

07:46 April 01

केशपूरमध्ये तृणमूल कार्यकर्त्याचा मृत्यू..

केशपूरमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच तृणमूलच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला काल (बुधवार) रात्री मेदिनीपुर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उत्तम दोलुई असे या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

07:25 April 01

नंदीग्राममध्ये मतदानांसाठी नागरिकांच्या रांगा..

नंदीग्राममध्ये मतदानासाठी सकाळी सात वाजेपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.

07:14 April 01

मतदानाला सुरुवात..

सकाळी सात वाजेपासून सर्व ठिकाणी मतदानास सुरुवात झाली आहे.

07:13 April 01

नंदीग्राममध्ये मतदानाची तयारी सुरू..

नंदीग्राममध्ये मतदानाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

06:16 April 01

पश्चिम बंगालमध्ये दुसऱया टप्प्यात 80.79 टक्के मतदानाची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम मतदारसंघातील मतदान याच टप्प्यात होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे खास लक्ष असणार आहे.

या टप्प्यामध्ये ३० मतदारसंघांमध्ये ८,३३२ मतदान केंद्रांवर मतदान पार पडेल. चार जिल्ह्यांमधील १७१ उमेदवारांचे भवितव्य आज नोंदवले जाईल. आज होणाऱ्या मतदानापैकी बांकुरा मतदारसंघात सर्वाधिक (११), तर केशपूर मतदारसंघात सर्वात कमी (३) उमेदवार उभे आहेत.

एकूण ३० मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ज्या मतदारसंघांमध्ये तीन पेक्षा जास्त उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल आहे, त्याठिकाणी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. एकूण १७१ उमेदवारांपैकी ४३ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तर, त्यांपैकी ३६ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

एकूण उमेदवारांपैकी ११ टक्के, म्हणजेच १९ उमेदवार महिला आहेत.

Last Updated : Apr 1, 2021, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.