मेष : आठवड्याची सुरवात काही नवीन उमेदीने होईल. आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामुळे अत्यंत व्याकुळ व्हाल. वैवाहिक जीवनातील तणाव आपल्या चिंतेस कारणीभूत ठरू शकते. आपणास आपल्या संततीकडून सौख्य मिळाले तरी जोडीदाराशी असलेल्या संबंधात कटुता येऊ शकते. ही कटुता दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रेमीजन नात्यातील आनंद अनुभवतील. त्यांच्यातील दुरावा दूर झाल्यानं ते एकमेकांना समजून घेतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. चांगले काम करून ते स्वतःसाठी स्थान निर्माण करू शकतील. त्यांना त्यांच्या वरिष्ठांचा पाठिंबा सुद्धा मिळेल. व्यापाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागेल. त्यांना काहीतरी चांगले करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतील. त्यांची एकाग्रता सुद्धा वृद्धिंगत होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आरोग्याची काळजी घ्यावी.
वृषभ : हा आठवडा मानसिक ताण वाढविणारा असू शकतो. सुरवातीस आपण खूपच तणावग्रस्त असाल. ह्या तणावातून बाहेर पडण्यास आठवड्याचा मध्य उगवेल. प्राप्ती सामान्यच असल्याने आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास सर्व काही सुरळीत होईल. अन्यथा समस्या वाढतील. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल. जोडीदाराशी मतभेद झाल्यामुळे समस्या संभवतात, परंतु थोडा धीर धरा. येणारा काळ चांगला असेल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या नात्यात प्रगती साधण्यासाठी आपणास थोडी हिंमत दाखवावी लागेल. तसेच आपल्या प्रेमिके समोर प्रेमाची कबुली द्यावी लागेल. ह्यासाठी आवश्यकता भासल्यास आपण एखाद्या मित्राची मदत सुद्धा घेऊ शकता. आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. विनाकारण आपला पैसा कोणाला देऊ नये. दिल्यास तो परत मिळण्याची अपेक्षा मनी बाळगू नये. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांना खूप धावपळ करावी लागेल. हा आठवडा व्यापारात खूप मोठी तेजी घेऊन येईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यशस्वी होण्याची संधी आहे.
मिथुन : हा आठवडा आपणास पुढे जाण्यास प्रेरित करेल. परंतु आपल्या मार्गात बरीच आव्हाने येत असल्याने आपला मार्ग अडवला जाईल. मात्र, आपण न खचता त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. प्राप्तीत खूप मोठी वाढ झाल्याने आपला आत्मविश्वास उंचावेल. असे असले तरी आपणास प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत परिस्थिती आपणास अनुकूल राहील. फक्त आपल्या वरिष्ठांशी हुज्जत घालत बसू नका. हा आठवडा व्यापारास अनुकूल आहे. गुंतवणुकीतून लाभ होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होईल. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळविण्यात यशस्वी होऊ शकाल. घरगुती वातावरण सुखावह राहील. मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपल्या प्रेमिकेची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अतिरिक्त लक्ष देण्याची गरज भासेल.
कर्क : हा आठवडा आपल्यासाठी चांगली बातमी घेऊन येणारा आहे. आपल्या कार्यक्षेत्रात बदल होण्याची संभावना आहे. कदाचित आपण नोकरी बदलाल किंवा सध्याच्या नोकरीत आपली बदली होऊ शकते, तेव्हा तयार राहावे. कामा निमित्त धावपळ वाढेल. कुटुंबियांना वेळ कमी दिल्याने कुटुंबात तणाव वाढू शकतो. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप संभवतात, तेव्हा सावध राहावे. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या अनेक योजना ज्या मंदावल्या होत्या त्या आता पूर्णत्वास जातील. त्यांचा आपणास फायदा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चांगली कामगिरी करतील, परंतु काही समस्या त्यांना त्रस्त करू शकतात. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. जोडीदाराशी समन्वयात सुधारणा होईल. प्रेमीजनांसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. त्यांना आपल्या कुटुंबीयांची परवानगी घेऊनच नात्यात पुढे जावे लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीस दुसरा पर्याय नाही.
सिंह : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखाद्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात असू शकता. ह्यात आपला खर्च सुद्धा जास्त होईल. असे असले तरी आपणास काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. हीच लोक भविष्यात आपल्या उपयोगी पडतील. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती उत्तम असेल. आपली मेहनत यशस्वी होईल. व्यापाऱ्यांना काही नवीन व वेगळा विचार करावा लागेल. असे केल्यासच ते त्यांच्या व्यापारात प्रगती करू शकतील. त्यावरच त्यांचा फायदा अवलंबून राहील. ह्या आठवड्यात आपली प्राप्ती सामान्यच राहील. आरोग्य सुद्धा सामान्यच राहील. विवाहितांना त्यांचे वैवाहिक जीवन अधिक सुखद करण्यासाठी आपल्या पूर्वीच्या चुका स्वीकारून जोडीदाराशी संवाद साधावा लागेल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपले नाते दृढ असल्याचे आपणास जाणवेल. आठवड्याची सुरवात प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात त्रास होईल. त्यासाठी त्यांना एखाद्या मार्गदर्शकाची गरज सुद्धा भासेल.
कन्या : आठवड्याची सुरवात प्रतिकूल नसली तरी आपण एखाद्या गोष्टीने खूप तणावग्रस्त असू शकता व त्यामुळे आपली प्रकृती सुद्धा बिघडू शकते. ह्या सर्वातून बाहेर पडण्यासाठी आपणास संधी व आत्मविश्वास असे दोन्ही प्राप्त होतील. व्यापाऱ्यांसाठी हे सर्व काहीसे आव्हानात्मक असू शकते. आपणास काही नवीन कामांवर लक्ष देण्याची गरज सुद्धा भासू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपले प्रयत्न व काम करण्याची गती उत्तम असल्याने नोकरीत आपली स्थिती उंचावल्याचे आपणास जाणवेल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील तणावातून बऱ्याच प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसून येईल. जोडीदाराशी आपले तसेच आपल्या कुटुंबियांशी सासुरवाडीचे असे दोन्ही कुटुंबियां दरम्यान सामंजस्य वाढविण्याच्या दिशेने आपण प्रयत्नशील असल्याचे दिसून येईल. प्रणयी जीवन सामान्य राहील. आपण आपल्या प्रेमिकेसाठी काही करण्याची योजना आखू शकता. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यशस्वी होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांनी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून खूप मेहनत करावी.
तूळ : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास आपल्या व जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. अन्यथा कोणत्याही एकाची प्रकृती चिंतेस कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे आपल्या खर्चात सुद्धा वाढ होईल. अर्थात आपणास प्राप्ती चांगली होईल. आपल्या योजना यशस्वी होतील. व्यवसायात यश प्राप्त होईल. आपल्या व्यावसायिक भागीदाराशी भांडण होण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. त्यांच्याशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत चढ - उतार येतील. आपण आपल्या कामावर लक्ष देऊ शकणार नाही. कामात काही त्रास होऊ शकतो. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण त्यात पुढाकार घेऊन विवाहाची तयारी करू शकता. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात त्रास होत असल्याचे जाणवेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी.
वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. खर्चात इतकी वाढ होईल कि त्यावर आपणास नियंत्रण ठेवावेच लागेल. अन्यथा आपली आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. आपली काही शिल्लक सुद्धा खर्च होईल. परंतु हिंमत हारु नका. आगामी काळात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांची धावपळ वाढेल. आपणास प्रवास सुद्धा करावे लागतील. हे प्रवास करून आपणास थकवा जाणवू शकतो किंवा आपण आजारी पडू शकता, तेव्हा थोडे सावध राहावे. संसर्गजन्य विकारांचा व तापाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोटाचे विकार सुद्धा त्रस्त करू शकतात. शुद्ध पाणी व सकस आहार घेणे अगत्याचे राहील. घरातील पदार्थच खावेत. व्यापाऱ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. त्यांना मेहनत वाढवावी लागेल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. विनाकारण केलेल्या चिंता त्यांचे नाते दुर्बल करू शकते. प्रेमीजनांसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. आपण आपल्या प्रेमिकेची एखादी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
धनु : हा आठवडा आपणास विरोधकांच्या पुढे घेऊन जाईल. व्यापारातील स्थिती जलद गतीने पुढे जाऊ लागेल. आपण रचलेली रणनीती आपणास व्यापारात प्रगती पथावर घेऊन जाईल. त्याचा आपणास मोठा फायदा होईल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा मोठा फायदा होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील. आपण आपल्या कामाचे तज्ञ व्हाल. आपले काम आपणास चांगले परिणाम मिळवून देईल. प्रकृतीतील बिघाड आपणास त्रस्त करू शकतो. कुटुंबीयांप्रती आपले कर्तव्य पार पाडाल. त्यांचे पूर्ण सहकार्य आपण मिळवू शकाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. आपल्या वैवाहिक जोडीदारामुळे आपणास एखादा मोठा फायदा होऊ शकतो. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. व्यापारी आपल्या व्यावसायिक भागीदारामुळे खूप मोठा लाभ मिळवू शकतील. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्रांचे सहकार्य मिळेल. त्यांच्यासह अभ्यास करून ते चांगले परिणाम मिळवू शकतील.
मकर : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. आठवड्याच्या सुरवातीस संतती कडून एखादी सुखद बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनासाठी आठवडा उत्तम आहे. जोडीदार आपल्याशी प्रेमळ वार्तालाप करेल. नात्यातील रोमांस टिकून राहील. सासुरवाडीकडील संबंध दृढ होतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रणयी जीवनास अनुकूल आहेत. आपली प्रेमिका तिच्या मनातील विचार मोकळेपणाने आपल्या समोर व्यक्त करेल. ते आपल्या पसंतीस उतरून आपला विश्वास द्विगुणित करेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा एखाद्या विशेष गोष्टीकडे लक्ष वेधत आहे. जर आपल्या पदोन्नतीची वेळ आली असेल तर ती ह्या आठवड्यात होऊ शकते. पगारवाढ सुद्धा संभवते. आपण मात्र अति आत्मविश्वासाने चुकीची कामे करू नयेत. वडिलांची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने त्यांची काळजी घ्यावी. आपल्या प्रकृतीत सुद्धा चढ - उतार होत असल्याचे दिसू शकते. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळतील.
कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस घरी पाहुण्यांची वर्दळ राहू शकते. त्यांना भेटून आपण आनंदित व्हाल. नशिबाच्या प्राबल्याने व्यापारात उत्तम यश मिळू शकते. आपल्या प्रतिष्ठेत व मान - सन्मानात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती हळू हळू नियंत्रणात येऊ लागेल. आपण सुद्धा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. जोडीदारासह बाहेर फिरावयास जाण्याची एखादी योजना ते बनवू शकतील. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या मनात काहीही न ठेवता आपल्या प्रेमिके समोर आपले विचार मोकळेपणाने मांडावेत. असे केल्याने एकमेकांवरील विश्वास द्विगुणित होईल. मित्रांच्या पाठिंब्यामुळे आपली कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. आठवड्याच्या सुरवातीपासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मीन : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपली आर्थिक स्थिती काहीशी कमकुवत असल्याने आपणास हात आखडता ठेऊनच गुंतवणूक करावी लागेल. आठवड्याचे मधले दिवस उत्तम आहेत. खर्चात कपात तर प्राप्तीत वाढ होईल. आठवड्याच्या अखेरीस बँकेतील शिल्लक वाढवू शकाल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. विवाहितांना किरकोळ वादांना सामोरे जावे लागू शकते. असे असले तरी त्यांचे नाते टिकून राहील. आपण जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर आपले नाते टिकवून आपल्या प्रेमिकेचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी मना पासून प्रयत्न केल्यास आपण यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
हेही वाचा :