नवी दिल्ली : ( Weather Update Today 9 January 2023 ) थंड वाऱ्यांमुळे थंडी वाढली आहे. हलके ढग आणि आकाशातील दाट धुके यामुळे हिवाळ्यात भर पडली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह देशातील पाच राज्यांसाठी रेड अलर्ट जारी ( Red Alert issued for five states ) केला आहे. तरी. येत्या काही दिवसांत थंडीच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. ( Red Alert For 5 States Dense Fog And Cold )
दृश्यमानता नोंदवण्यात आली : दाट धुक्यामुळे दृश्यमानता बरीच कमी झाली आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या उपग्रह प्रतिमा आणि उपलब्ध दृश्यमानतेच्या आकडेवारीनुसार धुक्याचा थर पंजाब आणि लगतच्या उत्तर-पश्चिम राजस्थानपासून बिहारसह हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेला आहे.आज पहाटे 5.30 वाजता उत्तर प्रदेशातील आग्रा येथे दृश्यमानता शून्य 0 मीटर, लखनऊ अमौसी 0 मीटर, वाराणसी बबतपूर 25 मीटर, बरेली 50 मीटर, बहराइच दृश्यमानता 50 मीटर, प्रयागराजमध्ये 50 मीटर नोंदवली गेली.बिहारमधील भागलपूरमध्ये 25 मीटर, पूर्णिया आणि गयामध्ये प्रत्येकी 50 मीटर, पाटणामध्ये 50 मीटर, उत्तर पश्चिम राजस्थानमधील गंगानगरमध्ये 25 मीटर नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे, पंजाबच्या भटिंडा येथे 0 मीटर, अमृतसरमध्ये 25 मीटर आणि अंबालामध्ये 25 मीटर, हिस्सारमध्ये 50 मीटर, दिल्ली मध्ये 25 मीटर, दिल्ली पालम मध्ये 50 मीटर दृश्यमानता नोंदवण्यात आली.
-
8 Jan, महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट शक्यता. 10-12° पर्यंत किमान तापमान. एक अंकि काही ठिकाणी.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट.
पुणे अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव...watch pic.twitter.com/LOWNYfdudA
">8 Jan, महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट शक्यता. 10-12° पर्यंत किमान तापमान. एक अंकि काही ठिकाणी.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 8, 2023
विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट.
पुणे अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव...watch pic.twitter.com/LOWNYfdudA8 Jan, महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट शक्यता. 10-12° पर्यंत किमान तापमान. एक अंकि काही ठिकाणी.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 8, 2023
विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट.
पुणे अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव...watch pic.twitter.com/LOWNYfdudA
दाट धुके पडण्याचा इशारा : पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, उत्तर राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, त्रिपुरा, मध्य प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवस दाट धुके पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दरम्यान, या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी दृश्यमानता शून्य मीटर असू शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हलके वारे आणि गंगेच्या मैदानात पृष्ठभागाजवळ जास्त आर्द्रता यामुळे पुढील तीन दिवस धुके अत्यंत दाट असेल. त्यामुळे हवामान खात्याने अनेक राज्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी ( Red and Orange Alerts issued ) केला आहे.
-
https://t.co/5CS4HYvmzw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Forecast बघा प्लीज pic.twitter.com/hqVVzcWONd
">https://t.co/5CS4HYvmzw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 8, 2023
Forecast बघा प्लीज pic.twitter.com/hqVVzcWONdhttps://t.co/5CS4HYvmzw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 8, 2023
Forecast बघा प्लीज pic.twitter.com/hqVVzcWONd
या राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट : ( Cold Red Alert in States ) हवामान खात्यानुसार, 10 जानेवारीपर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, यूपीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राजस्थान आणि बिहारसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत रविवारी विक्रमी थंडीची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सफदरजंग येथे किमान तापमान 1.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राजस्थानमध्येही थंडी जास्त होती. येथे 0.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ( Maharashtra weather update ) 10 जानेवारीपासून थंडीची लाट कमी होईल. यातून लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. १० जानेवारीच्या रात्रीपासून नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स येणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे 10 जानेवारीच्या रात्रीपासून दाट धुके आणि थंडीची लाटही येणार आहे.
महाराष्ट्रात थंडीचा पारा वाढण्याची शक्यता : ( Maharashtra cold temperature ) महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे. Temperature in Nandurbar District ) नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागात तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून गारठा वाढला आहे. दुपारपर्यंत वातावरणात गारठा राहत असल्याने नागरिकांना शकोटयांचा आधार घ्यावा लागत आहे. तर सपाट भागात तापमान 11 अंश सेल्सिअस आहे.पारा खाली आल्याने कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठला आहे.