ETV Bharat / bharat

Weather Update: राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस? - भारत हवामान अपडेट

भारतीय हवामान खात्याने देशभरातील विविध राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी झालेल्या पावसानंतर अनेक भागांत रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. मुसळधार पावसामुळे शहरातील तापमान 26.1 अंश सेल्सिअस होते, जे या वर्षीच्या सरासरीपेक्षा 13 अंशांनी कमी होते.

WEATHER FORECAST
राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा
author img

By

Published : May 2, 2023, 9:40 AM IST

नवी दिल्ली : देशभरातील हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांत अनेक राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसामुळे वातावरण आल्हाददायक राहिले आहे. उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणखी काही दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान कार्यालयाच्या माहितीनुसार, दिल्लीत 14.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित : आयएमडीने म्हटले आहे की, 2 मे रोजी पंजाब, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण-आंतरिक कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पुढील 24 तासांत जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश आणि तमिळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • We have issued an orange alert, & in some areas we have issued heavy rainfall warnings for next 2-3 days. In last 24 hours, it rained all over the state, with Kangra receiving maximum rainfall. There have been reports of hailstorms in Shimla & Jubbal. Rain will continue for next… pic.twitter.com/eYKHqbbuig

    — ANI (@ANI) May 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काही ठिकाणी गारपीट होऊ शकते : सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा आणि हरियाणामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ, अंतर्गत कर्नाटक, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे आणि दिल्ली एनसीआरच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, उर्वरित ईशान्य भारत, मराठवाडा आणि राजस्थान आणि गुजरातमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी गारपीट होऊ शकते.

वीज पडून एका 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू : दुसरीकडे सोमवारी दिल्लीसह देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात वीज पडून एका 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. नोएडामध्ये मुसळधार पावसात बांधकाम सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळून दोन जण जखमी झाले.

लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला : भारतीय हवामान विभागाच्या बुलेटिननुसार, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये बहुतेक ठिकाणी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 दरम्यान पाऊस झाला. बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे की, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, तटीय आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्येही अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला.

कमाल तापमान 10 अंशांनी कमी : दिल्लीत मुसळधार पाऊस पडला, रस्ते जलमय झाले आणि पावसापासून वाचण्यासाठी लोकांना इकडे तिकडे आसरा घ्यावा लागला. राष्ट्रीय राजधानीच्या काही भागात पाणी साचले, त्यामुळे अनेक भागांमध्ये वाहतूक मंदावली. मुसळधार पावसामुळे शहरातील तापमान 26.1 अंश सेल्सिअस होते, जे या वर्षीच्या सरासरीपेक्षा 13 अंशांनी कमी आहे. 13 वर्षातील हा दुसरा सर्वात थंड मे दिवस होता. तसेच, उन्हाळी हंगामात कमाल तापमान 10 अंशांनी कमी नोंदवलेला सलग दुसरा दिवस होता.

हेही वाचा : Raju Shetty Ratnagiri District Ban: बारसू प्रकल्पाबाबत राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी आदेश; सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ प्रदर्शित करण्यास मनाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.