ETV Bharat / bharat

Amritpal Singh Case : खलिस्तानवादी अमृतपाल सिंग वॉन्टेड! नेपाळ सीमेवर लागले पोस्टर

फरार अमृतपाल सिंगच्या शोधासाठी भारत नेपाळ सीमेवर वॉन्टेड पोस्टर्स लावण्यात आले आहेत. अमृतपालचे शेवटचे लोकेशन उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये सापडले आहे. महाराजगंज हे नेपाळ उत्तर प्रदेश सीमेला लागून आहे.

author img

By

Published : Mar 26, 2023, 11:54 AM IST

Amritpal Singh
अमृतपाल सिंग

चंदीगड : 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा गेल्या 9 दिवसांपासून शोध सुरू आहे. पंजाब व्यतिरिक्त 5 राज्यांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसरीकडे अमृतपालचे जॅकेट, चष्मा आणि ट्रॅकसूटमधील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ पटियाला येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अमृतपालला आश्रय देणाऱ्या महिलेला पतियाळा येथे अटक करण्यात आली आहे.

नेपाळ सीमेवर वॉन्टेड पोस्टर्स : आता अमृतपालच्या शोधासाठी नेपाळ सीमेवर वॉन्टेड पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालचे शेवटचे लोकेशन उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये सापडले आहे. महाराजगंज हे नेपाळ उत्तर प्रदेश सीमेला लागून आहे. पंजाब पोलिसांच्या गुप्तचर सूत्रांनी सांगितले की, अमृतपालने आपल्या खासगी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी शस्त्रे मागवली होती. ही शस्त्रे जम्मू - काश्मीरमार्गे पंजाबमध्ये पोहोचणार होती. अमृतपालला त्याच्या आनंदपूर खालसा फौज (AKF) आणि अमृतपाल टायगर फोर्स (ATF) या वैयक्तिक सैन्यांना प्रशिक्षित करायचे होते. त्यासाठी तो पाकिस्तानातील एका निवृत्त मेजरच्या संपर्कात होता.

दिल्ली विमानतळावर खलिस्तान समर्थकांकडून धमकी : राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाला त्याच्या फोनवर धमकीचा ऑडिओ कॉल आल्यानंतर खळबळ उडाली आहे. रेकॉर्ड केलेल्या कॉलमध्ये खलिस्तानी समर्थक दिल्लीच्या प्रगती मैदानावर कब्जा करण्याबाबत बोलत होते. भारताचा राष्ट्रध्वज खाली उतरवून तेथे खलिस्तानचा झेंडा फडकवला जाईल, असे धमकीद्वारे सांगण्यात आले आहे.

जथेदार हरप्रीत सिंग यांचा अमृतपालला सल्ला : वारिस पंजाब संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या अटकेवरून पंजाबमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता श्री अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी 27 मार्च रोजी शीख विचारवंतांची विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत पंजाबमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे. दुसरीकडे, जथेदार श्री अकाल तख्त साहिब यांनी अमृतपाल सिंग याला ताकीद देत त्याने स्वतः पोलिसांसमोर हजर राहावे, असे सांगितले आहे.

हेही वाचा : Vande Bharat Train News : जम्मू काश्मीरला पुढील वर्षी मिळणार वंदे भारत रेल्वे - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.