कोल्लम - अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने विस्मया प्रकरणी सोमवारी (दि. 23 मे) पती किरणकुमारला हुंड्यासाठी छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश -1 सुजित के एन यांनी भा.दं.वी.चे विविध कलम हुंड्यासाठी छळ, हुंडा बंदी कायद्याच्या विविध तरतुदींनुसार किरणकुमारला दोषी ठरवले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील जी मोहनराज यांनी न्यायालयाबाहेर माध्यमांना दिली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय मंगळवारी (दि. 24 मे) शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. यावेळी आम्ही जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करणार आहोत, असेही मोहनराज यांनी सांगितले.
भा.दं.वी.चे कलम 304ब अंतर्गत हुंडाबळी मृत्यूच्या गुन्ह्यात किमान सात वर्षे आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा आहे. भा.दं.वीचे कलम 498A अन्वये हुंड्यासाठी छळ करणे आणि भा.दं.वी.चे कलम 306 नुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे या गुन्ह्यांना अनुक्रमे कमाल तीन वर्षे आणि 10 वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
वडिलांनी विस्मयाच्या वडिलांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, तपास पथकाच्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. त्यांच्या सरकारने या खटल्याच्या तपासासाठी एक अतिशय चांगले तपास पथक आणि एक चांगला वकील नियुक्त केला.
शासकीय सेवेतून बडतर्फ - राज्याचे परिवहन मंत्री अँटनी राजू यांनी पत्रकारांना सांगितले की, फौजदारी खटल्यातील न्यायालयाचा निर्णय काहीही असो, कुमार याला सेवेतून बडतर्फ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. कुमार हा सहायक मोटार वाहन निरीक्षक होता.
पोलिसांनी सादर केले पाचशे पानी आरोपपत्र - केरळ पोलिसांनी आपल्या 500 पानांच्या आरोपपत्रात हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे विस्मयाने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. विस्मया (वय 22 वर्षे) ही 21 जून, 2021 रोजी कोल्लम जिल्ह्यातील सस्थमकोट्टा येथे तिच्या पतीच्या घरात मृतावस्थेत आढळूली होती. घटनेच्या एक दिवसापूर्वी कुमारने हुंड्यासाठी छळ केल्याबद्दल विस्मयाने तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवले होते. तसेच तिच्या शरीरावर जखमा आणि मारहाणीच्या खुणांचे फोटोही पाठवले होते.
इतका दिला होता हुंडा - तिच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, किरणला हुंडा म्हणून शंभर सोन्याची नाणी (एक नाणी आठ ग्रॅमची), एक एकराहून अधिक जमीन व दहा लाख रुपयांची कार हुंडा म्हणून 2020 मध्ये झालेल्या लग्नात दिली होती.