चेन्नई/मद्रास : तामिळनाडूतील दिंडीगुल-वट्टलकुंडू रस्त्याजवळ व्हॅन रस्त्याच्या उजव्या बाजूला वळविताना पाठीमागून येणाऱ्या बसची व्हॅनला जोरात धडक बसली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. बसची धडक बसल्यानंतर व्हॅन पुढील रस्त्यालगतच्या दुकानात घुसली. तेथील उभ्या असलेल्या दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ओम्नी व्हॅनचालक अन्नामलाई आणि त्यांचे नातेवाईक किरकोळ जखमी होऊन बचावले.
व्हॅनचालक व नातेवाईकांची माहिती : व्हॅनचालक कौटुंबिक कार्यक्रमासाठी नातेवाइकांसोबत ओम्नी चारचाकी व्हॅनमधून सिथयनकोट्टई ते आदी लक्ष्मीपूरम भागात गेले होते. अन्नामलाई ओम्नी व्हॅन चालवत होते. अन्नामलाई आणि त्यांचे नातेवाईक सुदैवाने किरकोळ जखमी होऊन बचावले.
हेही वाचा : Aircraft Crashes At Odisha : ओडिशात विमानाचा अपघात; महाराष्ट्रातील वैमानिक गंभीर जखमी