ETV Bharat / bharat

Explosion In Electric Scooter : घरासमोर उभ्या केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटीचा भीषण स्फोट, पाहा थरारक व्हिडिओ - इलेक्ट्रिक स्कूटी

बिहारमध्ये अचानक आग लागून एका इलेक्ट्रिक स्कूटीचा स्फोट झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्फोटानंतर तेथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी माती टाकून आग आटोक्यात आणली. (Explosion In Electric Scooter)

Explosion In Electric Scooter
इलेक्ट्रिक स्कूटीचा स्फोट
author img

By

Published : Aug 9, 2023, 4:19 PM IST

इलेक्ट्रिक स्कूटीचा स्फोट

वैशाली (बिहार) : बिहारच्या वैशालीमध्ये घरासमोर उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक स्कूटीचा जोरदार स्फोट झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्कूटीतून आधी धूर निघत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर काही मिनिटांनी स्फोट झाला. व्हायरल व्हिडिओ वैशाली जिल्ह्यातील दिघी पूर्वी इथला आहे. (Explosion In Electric Scooter)

स्कूटीमध्ये बॅटरीत होता बिघाड : ही स्कूटी हाजीपूर दिवाणी न्यायालयातील वकील अभिनय कौशल यांची आहे. त्यांनी एका वर्षापूर्वी ८५,००० रुपयाला ही स्कूटी खरेदी केली होती. मात्र तेव्हापासून स्कूटीमध्ये बॅटरीत बिघाड होता. याबाबत त्यांनी कंपनीकडे तक्रार केली असता कंपनीने त्यांना अनेकवेळा रोटेशनल बॅटरी बदलून दिली होती. ही घटना घडण्याच्या ३ दिवस आधीच त्यांनी बॅटरी बदलून आणली होती.

एका वर्षापासून स्कूटीच्या बॅटरीची समस्या होती. शोरूमवाले प्रत्येक वेळेस बॅटरी बदलून रोटेशनल बॅटरी द्यायचे. 3 दिवसांपूर्वीच बॅटरी बदलली होती. मी बॅटरी आणून माझ्या स्कूटीमध्ये बसवली. सकाळी ती घेऊन मी कोर्टात गेलो. कोर्टातून परत आल्यानंतर स्कूटी दारात उभी होती. संध्याकाळी स्कूटीतून अचानक धूर येऊ लागला आणि त्यानंतर तिने पेट घेतला. - अभिनय कौशल, स्कूटीचे मालक

मोठा अपघात टळला : दिलासादायक बाब म्हणजे, अभिनय कौशल हे कोर्टातून घरी परतल्यानंतर स्कूटीने त्यांच्या घरासमोर पेट घेतला. 'स्कूटी दिवाणी न्यायालयात दुचाकी स्टँडमध्ये उभी होती. तेथे इतर डझनभर दुचाकी होत्या. त्यावेळी जर स्कूटीचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती', असे त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रिक वाहनाला लागलेली आग कशी विझवावी : गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. देशात बनवलेल्या ९० टक्के इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला जातो. लिथियम इलेक्ट्रोलाइट अत्यंत ज्वलनशील आहे. ते सहज गरम होते. यामुळे वाहनाचा स्फोट होऊ शकतो. लिथियम-आयन बॅटरीमुळे लागलेली आग सामान्य पद्धतीने विझवू नये. ती विझवण्यासाठी चुकूनही पाण्याचा वापर करू नये. त्याऐवजी कोरड्या रासायनिक अग्निशामक यंत्रांचा वापर करावा.

हेही वाचा :

  1. Scooter battery explodes : इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; सात वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
  2. Driverless Vehicle : हे आहे भारतातील पहिले स्वयंचलित वाहन! बेंगळुरूच्या स्टार्टअप कंपनीने केले अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.