दुबई : संयुक्त अरब अमिरातीतील आघाडीची विमानसेवा कंपनी असेलल्या एमिरेटस एअरलाईन्सने अलीकडेच एक नवी जाहिरात प्रसारीत केली आहे. यात एमिरेटसची एक केबिन क्रु मेंबर जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर उभी राहिल्याचे दिसते. ही जाहिरात खरोखरच बुर्ज खलिफावर चित्रीत करण्यात आली का अशी चर्चा नंतर लगेच सोशल मीडियात सुरू झाली आणि एमिरेटसने याचे उत्तर देत ही जाहिरात कशी चित्रीत करण्यात आली याचाही एक व्हिडिओ जारी केला.
-
Reconnect with your loved ones or take a fabulous vacation.
— Emirates Airline (@emirates) August 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
From 8th August travel to the UK gets easier.#FlyEmiratesFlyBetter pic.twitter.com/pEB2qH6Vyo
">Reconnect with your loved ones or take a fabulous vacation.
— Emirates Airline (@emirates) August 5, 2021
From 8th August travel to the UK gets easier.#FlyEmiratesFlyBetter pic.twitter.com/pEB2qH6VyoReconnect with your loved ones or take a fabulous vacation.
— Emirates Airline (@emirates) August 5, 2021
From 8th August travel to the UK gets easier.#FlyEmiratesFlyBetter pic.twitter.com/pEB2qH6Vyo
जाहिरातीत दिसणारी एमिरेटसची क्रु मेंबर मुळात एक प्रोफेशनल स्कायडायव्हिंग इन्स्ट्रक्टर असून तिचे नाव निकोल स्मित-लुडविक असे आहे. जाहिरातीत ती काही फलके हातात घेतलेली दिसते. यावर एमिरेटससोबत तुम्हाला जगाच्या अत्युच्च टोकावर असल्याचा अनुभव येईल अशा आशयाचा मजकुर या फलकावर दिसतो. सुरूवातीला ती कुठे उभी आहे ते कळत नाही. मात्र नंतर जेव्हा कॅमेराद्वारे लाँगशॉट घेतला जातो तेव्हा ती बुर्ज खलिफावर उभी असल्याचे दिसून येते.
-
Real or fake? A lot of you have asked this question and we’re here to answer it.
— Emirates Airline (@emirates) August 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here’s how we made it to the top of the world’s tallest building, the @BurjKhalifa. https://t.co/AGLzMkjDON@EmaarDubai #FlyEmiratesFlyBetter pic.twitter.com/h5TefNQGQe
">Real or fake? A lot of you have asked this question and we’re here to answer it.
— Emirates Airline (@emirates) August 9, 2021
Here’s how we made it to the top of the world’s tallest building, the @BurjKhalifa. https://t.co/AGLzMkjDON@EmaarDubai #FlyEmiratesFlyBetter pic.twitter.com/h5TefNQGQeReal or fake? A lot of you have asked this question and we’re here to answer it.
— Emirates Airline (@emirates) August 9, 2021
Here’s how we made it to the top of the world’s tallest building, the @BurjKhalifa. https://t.co/AGLzMkjDON@EmaarDubai #FlyEmiratesFlyBetter pic.twitter.com/h5TefNQGQe
ही जाहिरात प्रसारीत झाल्यानंतर ती खरेच बुर्ज खलिफावर चित्रीत करण्यात आली आहे का? यावर सोशल मीडियातून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर एमिरेटसने ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ प्रसारीत करत ही जाहिरात कशी चित्रीत करण्यात आले याचा खुलासा केला. यात ही जाहिरात खरोखरच बुर्ज खलिफावर उभी राहून चित्रीत करण्यात आल्याचे एमिरेटसने स्पष्ट केले आहे. या चित्तथरारक जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चा होत आहे.
हेही वाचा - पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला दरवर्षी 100 अब्ज डॉलर एफडीआयची गरज