इंफाळ : मणिपूरमधील हिंसाचाराचे सत्र अजून चालूच आहे. या हिंसक आंदोलकांनी आता थेट केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांना टार्गेट केले आहे. आंदोलकांनी आरके रंजन सिंह यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना काल रात्री घडली आहे. सुदैवाने घरी कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. इंफाळमध्ये संचारबंदी लागू आहे, तरीही त्यांनी थेट मंत्र्यांचे घर लक्ष्य केले. दरम्यान या घराजवळ सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता, तरीही जमावाने हल्ला केला. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एक महिन्यापूर्वीही मंत्र्यावर असाच हल्ला झाला होता. मे महिन्यात झालेल्या हल्ल्यादरम्यान सुरक्षा जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला होता.
मंत्री म्हणाले - हे अमानवीय आहे, शांतता राखा : या घटनेवर राजकुमार रंजन सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या गृहराज्यात जे घडत आहे ते पाहून खूप वाईट वाटले. मी अजूनही शांततेचे आवाहन करत राहीन. अशा हिंसाचारात गुंतलेले लोक पूर्णपणे अमानवीय आहेत. मी सध्या केरळमध्ये अधिकृत कामासाठी आहे. सुदैवाने काल रात्री माझ्या इंफाळच्या घरी कोणीही जखमी झाले नाही. हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब आणून माझ्या घराच्या खालच्या आणि पहिल्या मजल्याचे नुकसान केले होते.
लवकर शांतता प्रस्थापित होण्याची आशा: याआधी गुरुवारी संध्याकाळी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग म्हणाले होते की, सरकार अनेक स्तरांवर चर्चा करत आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले होते. मणिपूरमध्ये बुधवारी झालेल्या हिंसाचाराच्या ताज्या घटनेत 9 जण ठार झाले. तर 10 जण जखमी झाले आहेत. मणिपूरमध्ये गेल्या महिनाभराहून अधिक काळ जातीय हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. गुरुवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, आमच्या वचनबद्धतेनुसार आम्ही सर्वांशी संपर्क साधत आहोत. आम्ही वेगवेगळ्या स्तरावर चर्चा करत आहोत. राज्यपालांनी शांतता समितीही स्थापन केली आहे. शांतता समितीच्या सदस्यांशी चर्चा सुरू आहे. मला आशा आहे की, राज्यातील जनतेच्या पाठिंब्याने आपण लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करू.
-
Rajkumar Ranjan's house set on fire in Manipur, Union Minister says: "Those indulging in violence are enemies of humanity"
— ANI Digital (@ani_digital) June 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/XBd7f9zYb6#Manipur #RajkumarRanjan #Imphal #Kongba pic.twitter.com/nPujvgO6bA
">Rajkumar Ranjan's house set on fire in Manipur, Union Minister says: "Those indulging in violence are enemies of humanity"
— ANI Digital (@ani_digital) June 16, 2023
Read @ANI Story | https://t.co/XBd7f9zYb6#Manipur #RajkumarRanjan #Imphal #Kongba pic.twitter.com/nPujvgO6bARajkumar Ranjan's house set on fire in Manipur, Union Minister says: "Those indulging in violence are enemies of humanity"
— ANI Digital (@ani_digital) June 16, 2023
Read @ANI Story | https://t.co/XBd7f9zYb6#Manipur #RajkumarRanjan #Imphal #Kongba pic.twitter.com/nPujvgO6bA
हेही वाचा -
- Manipur violence : मणिपूरमधील चर्चमध्ये हल्लेखोरांचा गोळीबार; 9 ठार, 15 जण जखमी
- Himanta Biswa Ram Madhav : मणिपूरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जहालवाद्यांची मदत घेतली?, हेमंता बिस्वा, राम माधव यांच्यावर गंभीर आरोप
- Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा- मल्लिकार्जुन खर्गे यांची राष्ट्रपतींकडे मागणी