ETV Bharat / bharat

लस घेतानाच मान्यवरांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन - कोरोना लसीकरण बातमी

कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली. मात्र, या लसीकरणावेळी लस घेणाऱ्यांनी मास्क काढल्याचे दिसून आले. पंतप्रधानांनी याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचा विसर पुनावाला आणि गुलेरिया यांसारख्या मान्यवरांनाच पडल्याचे दिसून आले. नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, विशेष म्हणजे लस घेताना तोंडावर मास्क ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

लस घेताना मान्यवर
लस घेताना मान्यवर
author img

By

Published : Jan 16, 2021, 3:12 PM IST

Updated : Jan 16, 2021, 3:19 PM IST

नवी दिल्ली - आज देशभरात कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात झाली. देशात पहिल्यांदा अग्रभागी असणाऱ्या कोरोना योद्ध्यांना म्हणजेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येत आहे. दिल्लीबरोबरच देशभरात इतरत्र ही लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आज एकूण ३२ राज्यांमध्ये ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी जरी लसीकरण होत असले तरी मास्क वापरणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. मात्र काही मान्यवर लस घेताना मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक वॅक्सिन घेतानाची खबरदारी पंतप्रधानांनी स्वतः अधोरेखित केली असूनही असे प्रकार दिसून आले.

पुनावाला, गुलेरिया यांनी घातला नाही मास्क

विशेष म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी आज कोरोनावरील लस घेतली. त्यांनीही तोंडावर मास्क घातलेला नव्हता. तसेच दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही लस घेतली. मात्र त्यावेळी त्यांनी मास्क काढला होता. इतरही काही ठिकाणी असे खबरदारी न घेतल्याचे प्रकार आढळून आले. ही बाब आरोग्य नियमांचे उल्लंघन करणारी आहे असे पंतप्रधानांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले होते. त्यातच कोरोना विरुद्धच्या युद्धात ज्यांनी हिरीरीने काम केले त्या दोन प्रमुख कोरोना योध्यांनीच अशाप्रकारे मास्क काढून नियम डावलल्याचे दिसून आले. अदर पुनावाला हे तर भारतीय लस निर्मितीमधील अध्वर्यु आहेत. त्यांनीच मास्कशिवाय लस घेतली. दुसरी व्यक्तीही तितकीच महत्वाची म्हणजेच एम्सचे संचालक गुलेरिया. त्यांनीही मास्क काढल्याचे दिसून आले. ही बाब गंभीर आहे असेच म्हणावे लागेल.

कोरोना अंताच्या अंतिम टप्प्यावर काळजी घेण्याची गरज

कोरोना विरोधातील युद्ध जिंकण्याच्या महत्वाच्या टप्प्यावर जग आहे. त्यावेळी कोरोनाला हरवायचे असेल तर तेवढ्याच तत्परतेने आणि काळजीपूर्वक लसिकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी देशभरात तयारीही पूर्ण झाली आहे. आज पहिल्या टप्प्यात ३२ राज्यामध्ये लसिकरण होत आहे. हे लसिकरणही काळजीपूर्वक झाले पाहिजे. कोणत्याही कोरोना प्रतिबंधक नियमावलीची पायमल्ली होता कामा नये याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे. त्याचवेळी ज्यांचा आदर्श आणि ज्यांच्या सूचनांचे पालन आपण करतो, त्याच मान्यवरांनी खबरदारी घेतली नाही तर चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना योद्ध्यांनीच लस घेताना काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा - देशभरात कोरोना लसीकरणाची लगबग सुरू...पाहा व्हिडिओ

हेही वाचा - जाणून घ्या भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लस निर्मितीचा प्रवास

Last Updated : Jan 16, 2021, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.