चेन्नई Vijayakant passes away : श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं चेन्नईतील मिओट रुग्णालयात दाखल करण्यात आलेले अभिनेते तथा डीएमडीके नेते विजयकांत यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर मिओट रुग्णालयात विजयकांत यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना विजयकांत यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
अभिनेता तथा डीएमडीकेचे नेते विजयकांत यांचं निधन : अभिनेते तथा डीएमडीकेचे नेते विजयकांत यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं चेन्नईतील मिओट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर मिओट रुग्णालयात व्हेंटीलेटरवर उपचार सुरू होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं मिओट रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. मात्र आज सकाळी रुग्णालयानं कॅप्टन विजयकांत यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं आहे. रुग्णालय प्रशासनानं याबाबतची माहिती दिली आहे.
रुग्णालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त : अभिनेता तथा डीएमडीकेचे नेते विजयकांत यांचं चेन्नईतील रुग्णालयात आज सकाळी निधन झालं आहे. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. त्यांच्या चाहत्यांची रुग्णालय परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं रुग्णालय प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. रुग्णालय परिसरात सध्या तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विजयकांत यांच्या पत्नीनं दिली होती प्रकृतीबाबतची माहिती : अभिनेते तथा डीएडीकेचे नेते कॅप्टन विजयकांत यांना बुधवारी मिओट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत मिओट रुग्णालयानं निवेदन जारी केलं होतं. त्यानंतर विजयकांत यांच्या पत्नी तथा डीएमडीकेच्या सरचिटणीस प्रेमलता विजयकांत यांनी एक व्हिडिओ जारी करुन अभिनेता विजयकांत यांची प्रकृती सुधारत असल्याचं स्पष्ट केलं होतं. "विजयकांत हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे" असं प्रेमलता विजयकांत यांनी या व्हिडिओत नमूद केलं होतं. मात्र आज सकाळी रुग्णालय प्रशासनानं विजयकांत यांच्या निधनाची माहिती दिल्यानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.