नई दिल्ली/गाजियाबाद - इंस्टाग्राम व्हिडीओ बनवण्यासाठी एका तरुणाने दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेवर स्टंट केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Delhi Meerut Expressway) हा तरुण गाडीच्या छतावर बसून जीव धोक्यात घालून दिसत आहे. तरुण कारच्या छतावर बसून दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर गाडी चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी अपघात झाला असता तर तरुणाचा जीव गेला असता. तसेच, दुसऱ्या व्यक्तीच्या जीवालाही धोका होऊ शकतो. वाहतूक पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली आहे. वाहनाचा क्रमांकही समोर आला आहे. याप्रकरणी लवकरच कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
काही महिन्यांपूर्वीही नोएडाच्या रस्त्यावर काही तरुण स्टंट करताना दिसले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, नोएडाच्या सेक्टर-12 च्या रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणारी कार जात आहे आणि मुले कारच्या खिडकीला लटकून स्टंट करताना दिसत आहेत. (Video Goes Viral Delhi-Meeruth Expressway) या मुलांना ना वाहतूक नियमांची पर्वा आहे ना पोलिसांची भीती. नोएडा आरटीओकडे नोंदणी केलेल्या वाहनावर पोलिसांचे स्टिकर होते.
हेही वाचा - Non Muslim village In Bihar : हा खरा भारत! गावात एकही मुस्लीम नसताना रोज होते नमाज