ETV Bharat / bharat

Joshimath Sinking : जोशीमठमध्ये प्रकल्प बाधितांनी काढला आक्रोश मोर्चा, एनटीपीसी गो बॅकचे दिले नारे - जोशीमठ

जोशीमठमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर पीडितांनी आक्रोश मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. पीडितांनी जोशीमठमध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून बांधण्यात येणाऱ्या बोगद्याविरोधात आंदोलन केले. या प्रकल्पामुळेच जोशीमठमध्ये दुर्घटना घडल्याचा नागरिकांनी आरोप केला. जोशीमठ बचाव संघर्ष समितीने हा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली.

Joshimath Sinking
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 27, 2023, 7:38 PM IST

चमोली - जोशीमठमध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून बोगदा बांधण्यात येत आहे. या बोगद्यामुळे दरड कोसळल्याचा नागरिकांचा आरोप आहे. जोशीमठ बचाव संघर्ष समितीने या बोगद्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. एनटीपीसीचा विष्णुघाट प्रकल्प तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी प्रकल्प बाधितांनी जोशीमठ बचाव संघर्ष समितीच्या बॅनरखाली आक्रोश मोर्चा काढला. या आक्रोश मोर्चात जोशीमठच्या विविध गावातील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले.

जोशीमठमध्ये प्रकल्प बाधितांनी काढला आक्रोश मोर्चा

जोशीमठ दुर्घटनेला प्रकल्प जबाबदार : जोशीमठ बचाव संघर्ष समितीने प्रकल्पाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात जोशीमठ बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तांनी सहभाग घेतला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते इंद्रेश मायखुरी यांनी जोशीमठ दुर्घटनेसाठी एनटीपीसीच्या विष्णुघाट प्रकल्पाला जबाबदार धरले. विष्णुघाट प्रकल्प त्वरित थांबवण्याची जोशीमठ प्रकल्पग्रस्तांची मागणी असल्याचेही इंद्रेश मायखुरी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. हेलंग मारवाडी बायपासचे काम थांबवण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.

पुनर्वसन रखडले : जोशीमठ दुर्घटनेला इतके दिवस उलटूनही सरकारने आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसनाची कोणतीही योजना राबविली नसल्याचे इंद्रेश मायखुरी यावेळी म्हणाले. अशा स्थितीत जोशीमठचे अस्तित्व वाचवण्यासाठी सरकारने जलद गतीने काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले. सरकारी काम कासव गतीने सुरू आहे, ते थांबवावे. एनटीपीसी प्रकल्पाबाबत जोशीमठच्या प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड संताप आहे. एनटीपीसीमुळे आज आम्ही रस्त्यावर आलो असल्याचे यावेळी आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी यावेळी सांगितले.

863 घरांना तडे : जोशीमठ शहर परिसरात भूस्खलनामुळे आतापर्यंत 863 इमारतींना तडे गेले आहेत. काही इमारतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यापैकी 181 इमारती असुरक्षित क्षेत्रात आहेत. तर 282 प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील 947 जणांना मदत शिबिरांमध्ये ठेवण्यात आले आहे. मदत शिबिरांमध्ये पीडितांना अन्न, पिण्याचे पाणी, औषध आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सार्वजनिक ठिकाणे, चौक आणि मदत शिबिरांच्या आसपास 20 ठिकाणी नियमित शेकोटीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मदत दिल्याचा दावा : जोशीमठ प्रकल्प बाधित कुटुंबांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुध्ये काही नागरिकांच्या घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. तर काही घरांचे कमी नुकसान झाले आहे. त्यातील नुकसान झालेल्या इमारतींसाठी एकरकमी विशेष पुनर्वसन पॅकेजची रक्कम पीडितांना देण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. यात पीडितांना मालाची वाहतूक आणि तात्काळ गरजांसाठी निधी दिला आहे. चमोली जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 585 पीडितांना 388.27 लाख रुपयांची मदत रक्कम वितरित करण्यात आल्याचा दावा केला आहे.

एनटीपीसीने दिले स्पष्टीकरण : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून बांधण्यात येणारा प्रकल्प आणि जोशीमठ दुर्घटनेचा कोणताही संबंध नसल्याचे एनटीपीसीने स्पष्ट केले आहे. तपोवन विष्णुगड प्रकल्पाचा संबंधित बोगदा जमिनीपासून एक किलोमीटरहून अधिक खाली असल्याची माहिती एनटीपीसीच्या वतीने देण्यात आली आहे. एनटीपीसीने बनवलेला बोगदा जोशीमठच्या खाली जात नाही. हा बोगदा टनेल बोरिंग मशिनद्वारे (टीबीएम) खोदण्यात आला असून सध्या ब्लास्टिंग केले जात नसल्याचेही स्पष्टीकरण एनटीपीसीने दिले आहे.

हेही वाचा - New Governor Of Maharashtra : अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.