वाराणसी/चांदौली - देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे वाराणसी दौऱ्यावर आहेत. शनिवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी श्री काशी विश्वनाथ मंदिर आणि काल भैरव मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी चांदौलीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृती स्थळावर पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली ( Venkaiah Naidu Varanasi Tour ) आहे.
उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त चांदौली जिल्ह्यात कडकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृतीस्थळावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या सोबत त्यांचे कुटुंबीय राज्यपाल आनंदीबेन पटेल, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, मंत्री रवींद्र जैस्वाल आणि दयाशंकर दयाळू होते.
दौऱ्यानिमित्त कडेकोट बंदोबस्त - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी मार्ग वळवले होते. शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत फक्त परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी त्यांना ओळखपत्र दाखवावे लागत होते.