ETV Bharat / bharat

Vande Bharat Train : रविवारी प्रवाशांना मिळणार वंदे भारत ट्रेनची भेट, पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा, पाहा, ट्रेनमधून घेतलेला आढावा - वंदे भारत ट्रेन

देशातल्या सहाव्या वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat train) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात हिरवा झेंडा दाखवतील. (Vande Bharat train inaugurated by Narendra Modi). तेथून ती बिलासपूर साठी रवाना होईल. ही वंदे भारत एक्सप्रेस चेन्नईहून बिलासपूरला पोहोचल्यानंतर तिची बारकाईने तपासणी करण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवारी दुपारी 12.48 वाजता बिलासपूरहून नागपूरला रवाना झाली होती. (Vande Bharat train between Nagpur Bilaspur)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 10, 2022, 9:15 PM IST

Updated : Dec 10, 2022, 10:22 PM IST

आतमधून अशी आहे वंदे भारत ट्रेन

बिलासपूर (छत्तीसगढ) : देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी रेल्वे योजनेअंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat train) सुरू करणार आहे. ही ट्रेन बिलासपूर ते नागपूर आणि नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणार आहे. (Vande Bharat train between Nagpur Bilaspur). रविवारी 11 डिसेंबर रोजी या ट्रेनचे औपचारिकरित्या उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. (Vande Bharat train inaugurated by Narendra Modi). ही ट्रेन 130 किमी वेगाने धावणार असून तिच्यात सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सुमारे 850 कामगार या कामात व्यस्त आहेत. ट्रॅकची सतत तपासणी केली जात आहे. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सिग्नल्सची दुरुस्तीही केली जात आहे. सध्या एसईसीआरचे सर्व अधिकारी ट्रेनच्या कामकाजावर सतत लक्ष ठेवून आहेत. कर्मचाऱ्यांनाही सतर्क करण्यात आले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या आणि भाडेही रेल्वे बोर्डाने ठरवले आहे. नागपूर ते बिलासपूर हे सुमारे 412 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या ट्रेनला साडेपाच तास लागणार आहेत.

वंदे भारत ट्रेन

ट्रेनचे वैशिष्ट्ये काय : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनेक सुविधा आहेत. गेट बंद झाल्यानंतरच ट्रेन धावण्यास सुरुवात होईल आणि ट्रेन थांबल्यानंतरच गेट उघडले जातील. प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन ट्रेनचे डबे तयार करण्यात आले आहेत. ट्रेनच्या 16 ही डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ट्रेनमध्ये इंटरनेट कनेक्शन सुविधा असेल. प्रवाशांना मोबाइल फोन किंवा टॅबलेट द्वारे वायफायचा वापर करता येईल. गाडीच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फिरत्या खुर्च्या असतील. प्रवाशांना त्यांची खुर्ची वळवून ट्रेनच्या बाहेरचे दृश्य पाहता येईल.

वंदे भारतचे इंजिनही खास आहे : वंदे भारत एक्स्प्रेसचे इंजिनही खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. मात्र हे इंजिन केबिन वेगळ्या कोचमध्ये आहे. ट्रेनचे इंजिन मेट्रो आणि बुलेटसारखे आहे. ही ट्रेन पूर्णपणे ऑटोमॅटिक ट्रेन आहे. ट्रेनच्या कोचमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी एक अतिशय मजबूत आणि विश्वासार्ह मशीन बसवण्यात आली आहे, ज्यामुळे ब्रेक लागताच लगेच ट्रेन थांबेल. यामुळे ट्रेन उलटण्याची शक्यता नगण्य असणार आहे.

वंदे भारतचे वेळापत्रक : वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ही गाडी बिलासपूर येथून सकाळी 6:45 वाजता सुटून रायपूरला सकाळी 8:03 वाजता पोहोचेल. तेथून दुर्गच्या दिशेने सकाळी 8:50, राजनांदगाव सकाळी 9:08 आणि तेथून सकाळी 10.30 वाजता गोंदियाकडे रवाना होईल. ही ट्रेन नागपूरला दुपारी 12.15 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेने ही गाडी नागपूरहून 14:05 वाजता सुटून गोंदियाला 15:38 वाजता, राजनांदगाव 16:45 वाजता, दुर्ग 17:17 वाजता, रायपूर 17:52 वाजता आणि बिलासपूर येथे 19:35 वाजता पोहोचेल.

Last Updated : Dec 10, 2022, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.