भोपाळ : भोपाळहून निजामुद्दीनकडे जाणाऱ्या वंदे भारत रेल्वेला आग लागल्याची घटना घडली आहे. कुरवई केथोरा येथे ही रेल्वे पोहोचली असताना रेल्वेला आग लागली. वंदे भारत रेल्वेच्या सी14 कोचला(डब्ब्याला) आग लागली होती. या डब्ब्याला आग लागल्याच समजताच रेल्वेतील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. रेल्वेच्या कोच सी 14 मध्ये असलेल्या बॅटरीमुळे आग लागली. अग्निशमन दलाकडून आग शमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ट्रेनला आग लागल्याचे असे कळाले : ट्रेन क्रमांक 20171 (वंदे भारत ट्रेन) आज सोमवारी पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी भोपाळच्या राणी कमलापतीहून दिल्लीच्या निजामुद्दीनकडे निघाली होती. कुरवई बीनाजवळील केथोरा येथे ही रेल्वे पोहोचली तेव्हा सी-१४ डब्यातून धूर निघत असल्याचे दिसले. धूर का निघत आहे याची चौकशी केली तेव्हा सीटाखाली आग लागल्याचे दिसून आले. यावेळी रेल्वेच्या सी-14 कोचमध्ये जवळपास 36 प्रवासी होते. डब्ब्याला आग लागल्याची माहिती होताच प्रवासी सैरवैर पळू लागले. काही मिनिटांच्या गोंधळानंतर रेल्वे थांबवण्यात आली. ट्रेन थांबल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग शमवण्याचे प्रयत्न करत आहे. वंदे भारत ट्रेनच्या C-14 कोचमध्ये असलेल्या एका प्रवाशाने या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
सकाळी 7 वाजून 10 मिनिटाच्या सुमारास मला माझ्या सीटखालून आग धगधगण्याचा आवाज आला. तेव्हा मी लोकांना सांगितले, त्यानंतर सर्वजण इकडे तिकडे पळू लागलो. जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा आम्हाला दिसले की कोचच्या बॅटरीला आग लागली होती. सध्या आम्ही खाली उतरलो असून अग्निशमन दलाचे पथक आग शमवण्याचा प्रयत्न करत आहेत. - रेल्वे प्रवासी
भोपाळ ते दिल्ली धावणारी ही मध्य प्रदेशची पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. 1 एप्रिलला स्वतः पंतप्रधान मोदींनी तिला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर 2 एप्रिलपासून ही रेल्वे रुळावर धावू लागली.
हेही वाचा -