ETV Bharat / bharat

Valentine Day 2023 : तू मेरी जिंदगी है म्हणत 210 जणांनी किडनी दान करुन वाचवला जोडीदाराचा जीव - महिलांनी केले सर्वाधिक किडनी दान

व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी प्रियकर आणि प्रेयसी आपल्या जोडीदाराला गुलाब भेट देतात. मात्र गुजरातीमधील अहमदाबादमध्ये गेल्या सहा वर्षात तब्बल 210 जणांनी आपली किडनी दान देऊन त्यांचा जीव वाचवला आहे. त्यामुळे प्रेमाची नवी परिभाषा या किडनी दानातून पुढे आल्याचे बोलले जाते. यात किडनी दान केल्याच्या घटनांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे.

Valentine Day 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 14, 2023, 5:08 PM IST

अहमदाबाद - जगभरात आज व्हॅलेन्टाईन डे मोठ्य़ा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मात्र काही जण आपल्या जीवनसाथीला वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. काही जण तर जोडीदाराला वाचवण्यासाठी प्राणांची बाजीही लावतात. अहमदाबादमध्ये तर आपल्या जोडीदाराला वाचवण्यासाठी 210 जणांनी चक्क आपली किडनी दान केल्याची प्रेरणादायी घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा वर्षात 201 जणांनी आपल्या जोडीदाराला वाचवण्यासाठी आपली किडनी दान केली आहे.

व्हॅलेन्टाईन डेला किडनी दान : व्हॅलेन्टाईन डेला प्रियकर आणि प्रेयसी आपले प्रेम व्यक्त करत एकमेकांना अनोखी भेट देतात. यात काहीजण तर आपल्या जोडीदाराला वाचवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवतात. अहमदाबाद येथे 2021 मध्ये व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी पतीने आपल्या पत्नीला किडनी दान करुन तिचा जीव वाचवल्याची प्रेरणादायी घटना उघडकीस आली होती. या घटनेतील पत्नी तीन वर्षापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होती. या प्रकरणाने पत्नीला जीवदान तर मिळालेच मात्र एक नवा आदर्श या पतीने घालून दिला आहे. त्यानंतर गेल्या सहा वर्षात 210 जणांनी आपल्या जोडीदाराला वाचवण्यासाठी किडनी दान केली आहे. यात आतापर्यंत 178 महिलांनी आपली किडनी दान केली आहे. तर 32 पुरुषांनीही त्यांच्या पत्नींना वाचवण्यासाठी आपली किडनी दान केल्याचे प्रकरण पुढे आले आहेत.

महिलांनी केले सर्वाधिक किडनी दान : गुजरातमध्ये गेल्या सहा वर्षात किडनी दान केल्याच्या अनेक घटना घडल्याचे दिसून आले आहे. यात 2018 मध्ये 9 पतींनी आपल्या पत्नीला किडनी दान केली, तर 40 महिलांनी आपल्या पतीला किडनी दान केल्याच्या घटना घडल्या आहेत. वर्ष 2019 मध्ये 9 पुरुषांनी आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी आपली किडनी दान केली, तर 46 महिलांनी आपल्या पतीला वाचवण्यासाठी आपली किडनी दान केली आहे. वर्ष 2020 मध्ये 2 पुरुषांनी आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी आपली किडनी दान केली आहे. तर 15 महिलांनी आपल्या पतीला वाचवण्यासाठी आपली किडनी दान केली आहे. वर्ष 2021 मध्ये 6 पुरुषांनी आपली किडनी दान केली आहे, तर 35 महिलांनी आपल्या पतीला वाचवण्यासाठी आपली किडनी दान केली आहे. वर्ष 2022 मध्ये 43 पुरुषांनी आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी आपली किडनी दान केली आहे. तर 6 महिलांनी आपली किडनी दान केल्याची घटना घडली आहे.

महिलांनी केली सर्वाधिक किडनी दान : व्हेलेन्टाईन डेला तरुणाई आपल्या प्रियकर आणि प्रेयसीला गुलाबाचे फुल भेट देतात. मात्र दिलेला गुलाब काही दिवसातच सुकून जातो. त्या उलट आपल्या जीवलगांना जर एखाद्या अवयव दानाची गरज असेल आणि ते जर केले तर ती व्यक्ती पुढील 50 ते 60 वर्ष जगण्याची शक्यता असते. गुजरातमध्ये किडनी दान करण्याचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असल्याची माहिती किडनी रुग्णालयाच्या निर्देशक विनीत मिश्रा यांनी दिली. गेल्या चार वर्षात 9 पुरुषांनी किडनी दान केली आहे. तर 40 महिलांनी आपल्या जोडीदाराला वाचवण्यासाठी आपली किडनी दान केल्याचेही त्या म्हणाल्या.

जोडीदाराच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे खरे प्रेम : प्रियकर आणि प्रेयसीच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हे खरे प्रेम आहे. प्रेमात त्याग हा महत्वाचा आहे. आपल्या जोडीदाराला वाचवण्यासाठी प्राणाची बाजी लावण्यासही खरे प्रेम करणारे मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळेच गुजरातमधील पती पत्नींनी आपली किडनी दान करुन आपल्या जोडीदाराला वाचवले आहे. 2021 मध्ये गुजरातमध्ये 304 किडनी प्रत्यारोपण करण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील 35 महिलांनी आपल्या पतीला जीवदान दिले आहे. तर 6 घटनांमध्ये पतींनी आपल्या पत्नींना किडनी देत जीवदान दिले आहे.

हेही वाचा - Valentine's Day 2023 : ताजमहालसमोर प्रिन्स कार्तिक आर्यन क्रिती सेनॉनसोबत झाला रोमँटिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.