ETV Bharat / bharat

कोरोनामधून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी, केंद्र सरकारकडून सूचना जारी - लस कधी घ्यावी

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात 16 जानेवरीपासून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आज कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गातून मुक्त झाल्याच्या तीन महिन्यांनंतर लसीकरण योग्य आहे, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.

लसीकरण
लसीकरण
author img

By

Published : May 19, 2021, 6:39 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला असून रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात 16 जानेवरीपासून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आज कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गातून मुक्त झाल्याच्या तीन महिन्यांनंतर लसीकरण योग्य आहे, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे सरकारने सांगितले आहे.

कोरोनामुक्त झाल्यानंतर शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते. मात्र, कोरोनाची लागण पुन्हा होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानतंरही लस घेणं गरजेचे आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन महिने वाट पाहावी. त्यानंतर लस घ्यावी, असे केंद्राने आज सांगितले.

लसीकरणात महाराष्ट्र प्रथम -

कोरोना विषाणूविरूद्ध लढल्या जाणार्‍या या लढाईत महाराष्ट्रा सरकारने सर्वांत जास्त लसीकरण केले आहे. महाराष्ट्राने दोन कोटी लोकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. देशभर लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर राजस्थान दुसर्‍या क्रमांकावर आहे. गुजरात तिसर्‍या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात ऑक्सफर्ड-अ‌ॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीचे लसीकरण सुरू आहे. देशातील लसींची कमतरता आणि वाढती मागणी यात दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणासह अनेक राज्यांनी लस पुरवठ्यासाठी जागतिक निविदा मागविण्याचे ठरविले आहे

देशातील आजची कोरोना स्थिती :

एकूण कोरोनाबाधित रुग्ण - 2 कोटी 54 लाख 96 हजार 330

एकूण कोरोनामुक्त रुग्ण - 2 कोटी 19 लाख 86 हजार 363

एकूण सक्रिय रुग्ण - 32 लाख 26 हजार 719

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू - 2 लाख 83 हजार 248

एकूण लसीकरण संख्या - 18 कोटी 58 लाख 09 हजार 302

हेही वाचा - Live update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरातमध्ये नुकसान पाहणी दौरा, मोदी राज्यात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.