ETV Bharat / bharat

Uttarkashi Tunnel Accident Rescue : सिलक्यारा बोगदा दुर्घटना प्रकरण; बचावकार्यासाठी पुश अर्थ ऑगर मशीन पोहोचल्या घटनास्थळी - सिलक्यारा बोगदा दुर्घटना प्रकरण

Uttarkashi Tunnel Accident Rescue : सिलक्यारा बोगद्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 40 कामगार अडकले आहेत. या कामगारांच्या बचावासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. हवाई दलानं पाठवलेल्या नवीन जॅक आणि पुश अर्थ ऑगर मशीनमुळे बचाव कार्याला वेग आला आहे.

Uttarkashi Tunnel Accident Rescu
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 2:25 PM IST

देहरादून Uttarkashi Tunnel Accident Rescue : उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात 40 कामगार अडकले आहेत. या कामगारांच्या बचावासाठी पाचव्या दिवशीही बचावकार्य सुरू आहे. हवाई दलाच्या मदतीनं या कामगारांना वाचवण्यासाठी हेवी ऑगर मशीनचा वापर करण्यात येत आहे. या कामगारांना वाचवण्यासाठी हेवी ऑगर मशीनचा वापर करण्यात येत असल्यानं त्यांना वाचवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांना वाचवण्यासाठी नवीन जॅक आणि पुश अर्थ ऑगर मशीनमुळे बचाव कार्याला वेग येणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य

ऑगर मशीनला अपेक्षित यश : सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आणण्यात आलेल्या ऑगर मशीनला अपेक्षित यश मिळत आहे. त्यामुळे लष्करांकडून नवीन जॅक आणि पुश अर्थ ऑगर मशीन बुधवारी दिल्लीहून मागवण्यात आलं आहे. हवाईदलाच्या हर्क्युलस विमानानं नवीन जॅक आणि पुश अर्थ ऑगर मशीन पाठवण्यात आल्या आहेत. त्या चिन्यालीसौर विमानतळावरुन सिलक्यारा इथं पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. नवीन जॅक आणि पुश अर्थ ऑगर मशीन ग्रीन कॉरिडॉरमधून सिलक्यारा नेण्यात आली आहे. या मशीनमुळे 40 कामगारांचा जीव वाचवण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

  • #WATCH | Uttarkashi tunnel accident: Latest visuals from the spot where the rescue operation is underway for 5th day to rescue the trapped labourers

    A part of the under construction Silkyara tunnel in Uttarkashi district collapsed on Sunday trapping 40 labourers. pic.twitter.com/BGr2z3kom7

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उत्तरकाशी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के : सिलक्यारा बोगद्यातील दरड दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांच्या बचावासाठी राज्य सरकारनं सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. केंद्र सरकारकडूनही मदत केली जात आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी बचाव कार्याचा सातत्यानं आढावा घेत आहेत. दरम्यान बुधवारी रात्री उत्तरकाशी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे सिलक्यारा बोगद्यातील दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी सुरु असलेल्या बचावकार्यात अडथळे निर्माण होण्याची भीती होती. मात्र असं काहीही झालं नसल्यानं गुरुवारी सकाळपासून सिलक्यारा बोगद्यातील बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Landslide in Uttarakhand : उत्तराखंडात निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर 36 मजूर अडकले, बचावकार्य सुरू
  2. Uttarkashi Tunnel Accident Rescue : उत्तरकाशी बोगद्यातून 40 कामगारांची सुटका करण्याकरिता प्रशासनाकडून करण्यात येणार 'हा' उपाय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.