ETV Bharat / bharat

Sidhu Moosewala Case UPDATE : गायक सिद्धू मुसेवाला याच्या शरीरात सापडल्या 24 गोळ्या, 6 संशयितांना अटक - Punjab STF information

मिळालेल्या माहितीनुसार, हेमकुंड साहिब यात्रेवरून ( Hemkund Sahib Yatra ) सुमारे 6 लोक पंजाबच्या दिशेने परत जात असताना उत्तराखंड एसटीएफ आणि पटेल नगर नया गाव चौकी पोलिसांनी पंजाब एसटीएफच्या माहितीच्या ( punjab STF information ) आधारे वाहन थांबवले. यावेळी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धू हत्याकांडातील मुख्य आरोपीला वाहन आणि आश्रय देण्याच्या प्रकरणात या आरोपीने ( Sidhu murder case ) मदत केली होती

गायक सिद्धू मुसेवाला
गायक सिद्धू मुसेवाला
author img

By

Published : May 30, 2022, 4:39 PM IST

Updated : May 30, 2022, 11:00 PM IST

डेहराडून - प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांच्या दिवसाढवळ्या हत्या केलेल्या आरोपींना अटक करण्याकरिता पंजाब पोलिसांचे प्रयत्न ( Punjab Police in singer Sidhu Musewala case ) सुरू आहेत. उत्तराखंड एसटीएफ आणि पंजाब एसटीएफने ( Uttarakhand STF and Punjab STF ) डेहराडून पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत शिमला बायपास नया गाव चौकी येथे नाकाबंदी केले. या हत्याकांडातील आरोपींना मदत करणाऱ्या 6 जणांना ताब्यात घेतले ( Six people arrested in Musewala murder ) आहे. आरोपींना पंजाब पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमकुंड साहिब यात्रेवरून ( Hemkund Sahib Yatra ) सुमारे 6 लोक पंजाबच्या दिशेने परत जात असताना उत्तराखंड एसटीएफ आणि पटेल नगर नया गाव चौकी पोलिसांनी पंजाब एसटीएफच्या माहितीच्या ( Punjab STF information ) आधारे वाहन थांबवले. यावेळी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धू हत्याकांडातील मुख्य आरोपीला वाहन आणि आश्रय देण्याच्या प्रकरणात या आरोपीने ( Sidhu murder case ) मदत केली होती. यासह अन्य ५ जणांनाही पोलिसांनी संशयाच्या आधारे ताब्यात घेतले. सध्या उत्तराखंड पोलिसांनी या अटकेबाबत कोणतीही माहिती जाहीर केली नाही.

गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर झाडण्यात आल्या होत्या 30 गोळ्या

सिद्धूच्या शवविच्छेदनादरम्यान कुटुंबीय तेथे उपस्थित होते. त्याचवेळी रुग्णालयाबाहेर त्यांचे अनेक चाहतेही उपस्थित होते. मुसेवाला यांच्या पोस्टमॉर्टम अहवालात त्यांचे संपूर्ण शरीर गोळ्यांनी छिन्नविछिन्न असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पंजाब एसटीएफने दिले होते इनपुट- प्राथमिक माहितीनुसार, पंजाब गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाशी संबंधित लोकांना पकडण्यासाठी पंजाब एसटीएफने उत्तराखंड एसटीएफला अहवाल दिला होता. उत्तराखंड एसटीएफने पटेल नगर पोलिसांच्या सहकार्याने शिमला बायपासला वेढा घातला. तिथे वाहन क्रमांकानुसार काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पंजाब एसटीएफची टीम या लोकांची पोलीस कोठडीत चौकशी करत आहे. त्याचवेळी स्थानिक गुप्तचर आयबीही घटनास्थळी पोहोचले आहेत. ते तपासात गुंतले आहेत.

गोळीबाराच्या 30 राउंड- प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसवाला यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गुन्हेगारांनी ही घटना घडवली आहे. हल्लेखोरांनी मूसवाला यांच्यावर सुमारे 30 राऊंड गोळीबार केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मृताचे कुटुंबीय शवविच्छेदन करण्यास तयार नसल्याचे वृत्त आहे.

काँग्रेस उच्च न्यायालय जाण्याच्या तयारीत - सिद्धू मुसेवाला खूनप्रकरणी काँग्रेस उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसने मुसेवाला यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रकरण घेऊन पंजाब काँग्रेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने एक दिवस आधीच त्यांची सुरक्षा काढून घेतली होती.

हेही वाचा-Nepal plane crash: हिमालयाच्या डोंगरात सापडले विमानाचे अवशेष; सर्व 22 विमान प्रवाशांचा मृत्यू

हेही वाचा-UPSC Result : युपीएससीचा निकाल जाहिर, 685 उमेदवार पात्र, पहिल्या तीन क्रमांकांवर महिलांची बाजी

हेही वाचा-राज्यसभा निवडणूक! भाजपने तिसरा उमेदवार दिला;घोडेबाजाराची शक्यता

Last Updated : May 30, 2022, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.