डेहराडून - उत्तराखंड स्पेशल टास्क फोर्स सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. उत्तराखंड एसटीएफने महाराष्ट्रात लपलेल्या सायबर गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे. एसटीएफने महाराष्ट्रातील पुणे शहरात लपलेल्या झारखंडच्या 2 सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. दोन्ही गुन्हेगार नेट बँकिंगमध्ये प्रवेश करून खातेदारांची फसवणूक करायचे.
दोन्ही गुन्हेगार झारखंड येथील रहिवासी आहेत. निसार अन्सारी आणि अब्दुल अशी त्यांची नावे आहेत. एसटीएफ आणि सायबर क्राइम पोलिसांनी संयुक्त ही कारवाई केली आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्हेगारांविरोधात नेट बँकिंगसह सायबर फसवणुकीची प्रकरणे देशभरात उघडकीस आली आहेत.
हेही वाचा - सायबर हल्ल्यांपासून सुरक्षा हवीय? मग हे वाचाच...
हेही वाचा - सॅटॅलाइट चॅनल आणि ओटीटीचा कॉन्टेट चोरणाऱ्या इंजिनीयरला सायबर विभागाकडून अटक
हेही वाचा - भारत-चीन तणावापूर्वीच सायबर हल्ल्यांमध्ये वाढ: सायबर सुरक्षा तज्ज्ञ
हेही वाचा - Fake job SMS : तुम्हालाही फेक जाहिरातींचा मॅसेज आला काय? मग वाचा सायबर सेलच्या सूचना...