हल्द्वानी - उत्तराखंड वन संशोधन केंद्राला आणखी एक यश हाती लागले आहे. यावेळी केंद्राने आर्किडच्या दुर्मीळ प्रजातीचा शोध लावला आहे. या आर्किडचे नाव 'सिफलान्थेरा इरेक्टावर आब्लिांसओलाटा' आहे. ही वनस्पती चमोली जिल्ह्यातील मंडल क्षेत्रात असणाऱ्या जंगलात सापडली आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रजातीचे आर्किड दिसून आले आहे. याला भारतीय वनस्पति सर्वेक्षण (Botanical Survey of India) संस्थेनेही मान्यता देत याला अधिकृतपणे वनस्पतींच्या यादीत सामील करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याच वर्षी संशोधन पथकात सामील झालेले रेंज ऑफिसर हरीश नेगी आणि जूनियर रिसर्च फेलो मनोज सिंह यांनी परिसरातील 1870 मीटर ऊंचीवर असणाऱ्या घनदाट जंगलातून आर्किडची नवीन प्रजाती 'सिफलान्थेरा इरेक्टा वर आब्लिांसओलाटा'चो शोध घेतला होता. हे जंगल आर्किडच्या दृष्टिने समृद्ध मानले जाते.
मुख्य वन संरक्षक संजीव चतुर्वेदी यांनी सांगितले, की नवीन प्रजातीचे आर्किड मिळल्यानंतर ही वनस्पती भारतीय वनस्पती सर्वेक्षण (BSI) संस्थेत परीक्षणासाठी पाठवली होती. तीन महिन्यानंतर BSI कडून अहवाल आला आहे. तपासणीत आढळले की, देशात पहिल्यांदाच आर्किडची ही प्रजात मिळाली आहे. या अधिकृतपणे भारतीय वनस्पती सर्वेक्षणने वनस्पतींच्या यादीत सामील केले आहे.
संजीव चतुर्वेदी यांनी सांगितले, की मागील वर्षी याच पथकाने चमोली जिल्ह्यात 3800 मीटर ऊंचीवर आर्किड 'लिपारिस पिग्निया'ची एक दुर्मीळ प्रजात शोधली होती. ही वनस्पती भारतात 124 वर्षानंतर आढळून आली होती. त्याचबरोबर पश्चिम हिमालय क्षेत्रात ही वनस्पती पहिल्यांदाच आढळली होती. उत्तराखंड राज्य जैव विविधतेसाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे.
30 जुलै रोजी चमोली जिल्ह्यातील गोपेश्वर येथे सहा एकर क्षेत्रात उत्तराखंड वन विभागाच्या संशोधन विभागाने एक आर्किड संरक्षण केंद्राची स्थापना केली आहे. हा उत्तर भारतातील पहिला आर्किड संरक्षण केंद्र आहे. येथे आर्किडच्या जवळपास 70 प्रजातींचे संरक्षण व लागण केली जाते.