ETV Bharat / bharat

Visa Wait Time : भारतीयांना व्हिसा लवकर मिळण्यासाठी अमेरिकन दूतावास घेणार विशेष मुलाखत - अमेरिकन दूतावास विशेष मुलाखत

अमेरिकन दूतावासाने 21 जानेवारीला विशेष शनिवार मुलाखतीच्या मालिकेतील पहिला कार्यक्रम आयोजित केला होता. अमेरिकन दूतावास भारतीयांना मिळणाऱ्या व्हिसाचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही महिन्यांत ठराविक शनिवारी होणाऱ्या मुलाखतींसाठी दूतावास अतिरिक्त स्लॉट प्रदान करत राहील.

american visa
अमेरिकन व्हिसा
author img

By

Published : Jan 23, 2023, 11:16 AM IST

नवी दिल्ली : भारतीयांसाठी व्हिसा प्रक्रियेतील विलंब कमी करण्याच्या उद्देशाने युनायटेड स्टेट्सने काही नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. यात प्रथमच अर्जदारांसाठी विशेष मुलाखतींचे वेळापत्रक तयार करणे आणि कॉन्सुलर कर्मचार्‍यांची संख्या वाढवणे समाविष्ट आहे. व्हिसा प्रतीक्षा कमी करण्यासाठी बहु-आयामी दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून, दिल्लीतील अमेरिकेचा दूतावास आणि मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद येथील वाणिज्य दूतावासांनी 'विशेष शनिवार मुलाखत दिन' आयोजित केला होता.

अमेरिकन दूतावासाचे निवेदन : अमेरिकेच्या दूतावासाने रविवारी एका निवेदनात सांगितले की, '21 जानेवारीला भारतातील अमेरिकन दूतावासाने प्रथमच व्हिसा अर्जदारांच्या प्रतीक्षा कालावधी कमी करण्याच्या प्रमुख प्रयत्नात विशेष शनिवार मुलाखतीच्या मालिकेतील पहिला कार्यक्रम आयोजित केला होता. नवी दिल्लीतील यूएस दूतावास आणि मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद येथील वाणिज्य दूतावासांनी व्हिसा मुलाखतीची आवश्यकता असलेल्या अर्जदारांना सामावून घेण्यासाठी शनिवारी वाणिज्य दूतावास पुन्हा सुरू केले'. येत्या काही महिन्यांत ठराविक शनिवारी होणाऱ्या मुलाखतींसाठी दूतावास अतिरिक्त स्लॉट प्रदान करत राहील.

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स : कोणत्या देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे हे जाणून घेण्यासाठी हेन्ली इन्स्टिट्यूट दरवर्षी पासपोर्ट इंडेक्स जारी करते. हेन्ली इन्स्टिट्यूटने नुकताच यावर्षीचा पासपोर्ट इंडेक्स 2023 जारी केला आहे. लेटेस्ट क्रमवारीनुसार भारताला 2 अंकाचा फायदा झाला असून या यादीत भारताचा क्रमांक 85 वा आहे. आता भारतीयांना 59 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळणार आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या नवीन रँकिंगनुसार जपानचा पासपोर्ट हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. याचाच अर्थ जपानी नागरिक जगातील 193 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात.

पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय? : पासपोर्ट इंडेक्स म्हणजे एखाद्या देशाचा पासपोर्ट जागतिक पातळीवर किती मजबूत किंवा किती कमकुवत आहे, याचे प्रमाण. पासपोर्ट मजबूत किंवा कमकुवत होण्यामागे डिस्पोजेबल इन्कम सारख्या काही खास गोष्टी काम करतात. जपान सारख्या देशाकडे पाहिले तर तिथले सरासरी डिस्पोजेबल उत्पन्न खूप चांगले आहे. डिस्पोजेबल उत्पन्न म्हणजे कर आणि इतर खर्चानंतर शिल्लक राहिलेल्या पैशाचा संदर्भ. हा पैसाही वाचवता येतो किंवा प्रवासावर खर्च करता येतो. ही रक्कम सध्या जपानी लोकांकडे सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत ते कोणत्याही देशाला भेट द्यायला गेले तर त्यांचा मोठा खर्च होईल आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. त्यामुळेच जवळपास सर्वच देश जपानी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.

हेही वाचा : Henley Passport Index 2023 : जपानचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली, भारताचा क्रमांक 85 वा ; जाणून घ्या पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.