ETV Bharat / bharat

बिहार विधानसभेत दारूवरून राडा.. सत्ताधारी-विरोधकांत तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ - तेजस्वी यादव

बिहार विधानसभेत शाळेत सापडलेल्या दारूवरून तुफान राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी व विरोधात वेलमध्ये भिडले तसेच जातिवाचक शिवीगाळही झाल्याचा आरोप केला जात आहे. मुझफ्फरपूर येथे शाळेत सापडलेल्या अवैध दारू प्रकरणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष आरजेडीने आक्रमक भूमिका घेत महसूलमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

Uproar in Bihar Assembly
Uproar in Bihar Assembly
author img

By

Published : Mar 13, 2021, 8:09 PM IST

पाटणा - विधानसभेला लोकशाहीचे मंदिर संबोधले जाते. मात्र बिहारमध्ये लोकशाहीच्या या मंदिराची प्रतिष्ठा व सन्मान आमदारांनी पार धुळीस मिळवला. आज बिहार विधानसभेत जोरदार राडा पाहायला मिळाला ते खेदजनक होते. विधानसभा अध्यक्षांच्या समोरच सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

बिहार विधानसभेमध्ये आज दारूवरून तुफान राडा पाहायला मिळाला. मुझफ्फरपूर येथे शाळेत सापडलेल्या अवैध दारू प्रकरणी विरोधी पक्ष आरजेडीने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच महसूलमंत्री रामसुरत राय यांच्या राजीनाम्याची मागणीही आरजेडीने लावून धरली होती. मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. धक्काबुक्की व शिवीगाळ यांनी सभागृह दणाणून गेले.

बिहार विधानसभेत दारूवरून राडा

शाळेत सापडला अवैध दारूसाठा -

मुझफ्फरपूरमध्ये महसूलमंत्री रामसुरत राज यांच्या भावाकडून चालवण्यात येत असलेल्या शाळेत अवैध दारू साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणावरून महसूलमंत्री रामसूरत राय यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा दारूबंदीवर बोलण्यास सुरुवात केली. त्यावरून आरोप प्रत्यारोपांस सुरुवात झाली. तेव्हा विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक असते तर उपमुख्यमंत्रिपद हे घटनात्मक नसते असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला, त्यावरून सत्ताधारी पक्षांचे आमदार अधिकच संतप्त झाले.

बिहार विधानसभेत दारूवरून राडा

हे ही वाचा - रतन टाटांनी घेतली कोरोना लस

भाजप आमदार संजय सरावगी, भाजपचे मुख्य सचेतक डॉ. संजीव आणि उप सचेतक जनक सिंह व आरजेडीचे आमदार रामवृक्ष सदा यांच्यात हाणामारी झाली. आरजेडी आमदार रामवृक्ष सदा यांनी आरोप लावला की, सत्ताधारी आमदारांनी अपशब्दांच्या वापर करत जातिवाचक शिव्याही दिल्या.

हे ही वाचा - इस्रोच्या साऊंडींग रॉकेट RH-60 चे यशस्वी प्रक्षेपण

जनतेने आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपले प्रतिनिधी विधानसभेत पाठवले मात्र जरा विचार करा जे लोकप्रतिनिधी भर सभागृहात हाणामारी करत असतील ते सभागृहाच्या बाहेर कसे वागत असतील ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.