ETV Bharat / bharat

यूपीतील माफियाराज : गंगेच्या किनारी राहणारा 'नेपाळी' कसा झाला गँगस्टर.. एका 'डॉन'ची न वाचलेली कथा

author img

By

Published : Apr 16, 2022, 8:59 PM IST

गंगेच्या घाटावर तो गांजा फुकत बसायचा.. त्याच्या डोळ्यांमध्ये वाराणसीवर राज्य करण्याचे स्वप्न होते.. खून, खंडणी, अपहरण एकप्रकारे त्याचा 'शौक'च झाले होते.. अन्नू त्रिपाठीपासून मुन्ना बजरंगीपर्यंत, भयानक गुंडांच्या छत्रछायेखाली त्याने खळबळ उडवून दिली होती.. २ दशकांनंतरही हा डॉन कोण आहे हे उत्तर प्रदेश पोलिसांसाठी एक कोडेच आहे..

यूपीतील माफियाराज : गंगेच्या किनारी राहणारा 'नेपाळी' कसा झाला गँगस्टर.. एका 'डॉन'ची न ऐकलेली कथा

वाराणसी ( उत्तर प्रदेश ) : हा तो काळ होता जेव्हा पूर्वांचलमध्ये मुख्तार अन्सारी, ब्रिजेश सिंग, मुन्ना बजरंगी यांसारख्या माफियांची हुकूमत चालू होती. ते प्रत्येक लहान मोठ्या गुंडांसाठी 'आयडॉल' झाले होते. आणि त्यांच्याप्रमाणेच पूर्वांचलमध्ये राज्य करण्याचे स्वप्न पाहत असे. असाच एक तरुण होता विश्वास शर्मा, ज्याला गंगेच्या लाटा पाहून केवळ वाराणसीच नव्हे तर संपूर्ण पूर्वांचलवर राज्य करण्याचे स्वप्न पडायचे. मात्र, वडील श्रीधर आपल्या दोन्ही मुलांचे नशीब सुधारण्याचे स्वप्न उरी बाळगून आपले घर सोडून नेपाळपासून 500 किमी अंतरावर असलेल्या भोले बाबाचे शहर वाराणसीत आले होते.

माफियाच्या कथांनी आयुष्य बदलले : कामात व्यस्त असलेल्या श्रीधरला मुलगा विश्वासकडे लक्ष देता येत नव्हते. त्यामुळे विश्वास स्त्यावरच्या मुलांसोबत बसत. बाबा भोलेनाथांचे पवित्र शहर असलेले वाराणसी खरे तर मंत्रोच्चार, धार्मिक संवाद आणि आरतीच्या तालात मग्न झालेले असे. मात्र त्याच वाराणसीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये भटकणारे तरुण गुन्हेगारीची बाराखडी शिकत. त्यापैकी एक होता विश्वास शर्मा. बनारसच्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये वाढलेला हा मुलगा परिसरात नेपाळी म्हणून प्रसिद्ध झाला. नेपाळमध्ये जन्मल्यामुळे त्यांना हे आडनाव मिळाले. पण हे नाव नंतर दहशतीचे दुसरे नाव बनले. विश्वास काशी शहरातील कपिलेश्वर गल्लीत भाड्याच्या घरात भाऊ, बहीण आणि आई-वडिलांसोबत राहत होता. परिस्थितीने गरीब असलेला विश्वास हा पैसा कमावण्याचे मार्ग शोधत असे. त्यासाठी त्याला फक्त गुन्हेगारीचा मार्ग समजला. नेपाळी, तीन भावंडांपैकी सर्वात मोठा. याच अरुंद गल्ल्यांमध्ये मुख्तार अन्सारी, ब्रजेश सिंग किंवा मुन्ना बजरंगी यांसारख्या माफिया डॉनचे किस्से ऐकवले जात. मुफलिसी आणि माफिया डॉनच्या क्रूर कथांनी विश्वासच्या मनावर मोठा प्रभाव पाडला आणि एके दिवशी त्यानेही गुन्हेगारीच्या मार्गावर पहिले पाऊल टाकले.

विश्वास नेपाळी
विश्वास नेपाळी उर्फ विश्वास शर्मा

गुन्हेगारीच्या जगात प्रवेश : विश्वासला आता घाई झाली होती, त्याला पटकन पैसे कमवायचे होते. गंगेच्या घाटावर बसून तो गांज्याचा फडशा पाडत रोज नवनवीन योजना आखत असे. आणि शेवटी त्याने खंडणीचा धंदा सुरू करण्याचा बेत आखला. पहिला बळी म्हणून एका डाळ व्यापाऱ्याची निवड करण्यात आली. डाळ व्यापाऱ्याने खंडणी मागितली म्हणून पोलिसात तक्रार केली. 2001 मध्ये विश्वास विरुद्ध भेलुपूर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता. बनारसमध्ये दुसरा गुंड जन्माला यावा, असे पोलिसांना वाटत नव्हते. त्यामुळे भीती निर्माण करण्यासाठी विश्वासचे वडील आणि भावाला पोलिस ठाण्यात आणले गेले. 7 दिवस विश्वासच्या वडिलांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. आणि ज्यादिवशी पोलिसांनी त्यांना सोडले त्याच दिवशी विश्वासच्या वडिलांनी वाराणसी शहर सोडले. वाराणसी आणि त्यांच्या मुलाशी संबंध तोडल्यानंतर वडील श्रीधर नेपाळला परत गेले. धमकीच्या आगीत होरपळून निघालेल्या विश्वास नेपाळी याने संधी मिळताच या डाळ व्यापाऱ्याची भरदिवसा हत्या केली. ज्याने त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या खळबळजनक हत्येने विश्वास नेपाळी पोलिस आणि गुन्हेगार दोघांच्याही नजरेत आला. गुन्हेगारीच्या अंधाऱ्या दुनियेचा तो एक भाग बनताच विश्वासला एकापेक्षा एक कुप्रसिद्ध गुरूंची साथ मिळू लागली. अनुराग त्रिपाठी उर्फ ​​अन्नू त्रिपाठी, बाबू यादव, मोनू तिवारी, बंशी यादव यांसारख्या कुख्यात गुन्हेगारांची साथ मिळाल्याने विश्वासचा आत्मविश्वास दुप्पट झाला. गुन्हेगारीच्या मार्गावर त्याची पावले वेगाने पडू लागली. खंडणी मागणे हा त्याचा मुख्य व्यवसाय बनला होता आणि हत्या हा त्याच्या डाव्या हाताचा खेळ बनला होता.

बाजारात लावली स्वतःची पोस्टर्स : पूर्वांचलमधील सर्वात मोठी डाळ बाजारपेठ असलेल्या विश्वेश्वरगंजच्या व्यापाऱ्यांसाठी तो दिवस एखाद्या मोठ्या वादळापेक्षा कमी नव्हता. बाजारात पोहोचताच भिंतींवर लावलेल्या पोस्टरने व्यापाऱ्यांची झोप उडवली. इथल्या प्रत्येक भिंतीवर एक पोस्टर होते. ज्यात विश्वास नेपाळी याने लिहिले होते की, जर जगायचं असेल तर पैसे द्यावे लागतील. ही पोस्टर्स नेपाळीने स्वतः छापली आणि प्रत्येक भिंतीवर लावली. ही पोस्टर्स स्वत: विश्वास नेपाळीने त्यांच्या संगणकावरून बनवली. तुरुंगात अन्नू त्रिपाठी आणि बंशी यादव यांच्या हत्येनंतर विश्वास थोडा कमजोर झाला होता. पण तेव्हढ्यातच पूर्वांचलचा माफिया मुन्ना बजरंगीची नजर विश्वास नेपाळी याच्यावर पडली. मुन्ना बजरंगी टोळीत प्रवेश झाल्यानंतर विश्वास नेपाळीच्या गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढू लागला. मुन्ना बजरंगीने केलेल्या सर्व गुन्ह्यांचा मास्टर प्लॅन विश्वास नेपाळीने बनवला होता. गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून पळून कसे जायचे हे नेपाळीच सांगत असे.

गुन्हेगारीचा हाय-टेक मोड : विश्वास नेपाळी याने कधीही सोबत फोन ठेवला नसल्याचे सांगितले जाते. जेव्हा जेव्हा त्याला खंडणीसाठी फोन करायचा असे तेव्हा तो नवीन नंबर घेऊन फोन करायचा आणि सिम फेकायचा. नेपाळी इंटरनेट सर्फिंगमध्येही निष्णात होता. विश्‍वास नेपाळी यांनीही गुन्हेगारीच्या जगावर राज्य करण्यासाठी इंटरनेटचा चांगलाच फायदा घेत. हा तो काळ होता जेव्हा सायबर पोलिस फारसे सक्रिय नव्हते आणि गुन्हेगारांनाही इंटरनेटबद्दल कमी माहिती होती. त्यावेळी विश्वासने एका सायबर कॅफे ऑपरेटरकडून इंटरनेटशी संबंधित सर्व युक्त्या शिकून घेतल्या होत्या. त्याने ऋषी पंडित उर्फ ​​अर्जुन पंडित याला इंटरनेट कसे वापरायचे हे शिकवले होते. 2012 मध्ये ऋषी पंडितला वाराणसी पोलिसांनी अटक केली तेव्हा त्यांनी सांगितले की, विश्वासने कधीही मोबाईल सोबत ठेवला नाही. जेव्हा जेव्हा त्याने गुन्ह्याची योजना आखली तेव्हा तो मेलच्या ड्राफ्टमध्ये लिहून ठेवायचा आणि तो मसुद्यातच उघडून तो वाचायचा. विश्वास नेपाळीच्या या पद्धतीने त्याला पोलिसांपासून नेहमीच वाचवले. विश्वास नेपाळी केवळ वाराणसीचाच नाही तर आता पूर्वांचलमध्ये तसेच जरयमच्या जगात मोठे नाव बनले होते. आता मुन्ना बजरंगीचा उजवा हात बनलेल्या विश्वास नेपाळीवर पोलिसांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. विश्वास नेपाळीविरुद्ध आतापर्यंत खून, दरोडा आणि खंडणीचे सुमारे १७ गुन्हे दाखल आहेत.

मुन्ना बजरंगीची भेट : ज्या मुन्ना बजरंगीने विश्‍वासला गुन्हेगारीच्या मार्गावर धावायला शिकवले, त्याच मुन्ना बजरंगीला त्याने आपला शत्रू बनवले. खंडणी न दिल्याने विश्वासने मुन्ना बजरंगीचा खास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊस व्यापाऱ्याची हत्या केली. याचा राग येऊन मुन्ना बजरंगीने विश्वासला टोळीतून हाकलून दिले. यानंतर विश्वासने आयडी 21 नावाने स्वतःची टोळी तयार केली आणि या टोळीत पूर्वांचलमधील कुख्यात गुन्हेगारांचा समावेश केला.

जेव्हा विश्वास नेपाळी सनी सिंग टोळीपासून वेगळा झाला : वाराणसी आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये, आयडी 21 चे गुंड आता व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करत होते. विश्‍वास नेपाळी यांचे जरयामच्या जगात राज्य होते. दरम्यान, या परिसरात वर्चस्व गाजवणाऱ्या सनी सिंग टोळीने व्यापाऱ्यांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली. कुख्यात सनी सिंग आणि रूपेश सेठ यांनी मिळून सराफा व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली. विश्वास नेपाळी याच्यासाठी हे थेट आव्हान होते. विश्वास नेपाळी याच्यासाठी हा त्याच्या वर्चस्वाला धक्का होता. यादरम्यान एका विश्वासू व्यक्तीची हत्या करण्यात आली. या हत्येत गुड्डू मामा आणि रुपेश सेठ यांची नावे समोर आली आहेत. विश्वासला आपले संस्थान हादरलेले दिसू लागले होते. मात्र, काही वेळाने सनी सिंगला पोलिसांनी चकमकीत ठार केले. इतकंच नाही तर विश्वासचे अनेक गुंडही पोलिसांनी चकमकीत मारले. धोका ओळखून विश्वास नेपाळला पळून गेला.

दीड दशकापासून शोध सुरु : वाराणसीसह पूर्वांचलच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या विश्वास नेपाळी याच्यावर दरोडा, खून आणि खंडणीचे ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर १० वर्षांपूर्वी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र वाराणसी पोलिसांना विश्वास सापडला नाही. पोलिसांच्या नोंदीमध्ये विश्वास नेपाळी यांचे एकच चित्र आहे आणि तेही एक दशक जुने आहे. नवीन चित्र नसल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

विश्वास नेपाळी माओवादी संघटनांच्या हाती : नेपाळमध्ये राहत असताना विश्वासने तेथे स्वतःचे प्रस्थ बसवल्याने सांगितले जाते. विश्वास नेपाळी हा विश्व शर्मा या नावाने नेपाळमध्ये राहत असून, माओवादी संघटनांसोबत काम करत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो सतत आपला ठावठिकाणा बदलतो. एवढेच नाही तर ट्रॅव्हल एजन्सीच्या व्यवसायाच्या नावाखाली तो गँग आयडी 21 चालवत आहे.

विश्वासचे सर्व साथीदार मारले : विश्‍वास नेपाळी याने गुन्हेगारीच्या दुनियेत जे साथीदार बनवले होते ते सगळे एकतर पोलिसांच्या चकमकीत मारले गेले किंवा टोळीयुद्धात मारले गेले. एकेकाळी मुन्ना बजरंगीचे शार्प शूटर असलेले अन्नू त्रिपाठी, बाबू यादवच्या वेळी विश्वास नेपाळी यानी गुन्हेगारीच्या दुनियेत प्रवेश केला होता. बनारसच्या मध्यवर्ती कारागृहात अन्नू त्रिपाठी तर बाबू यादव पोलीस चकमकीत मारला गेला. तर दुसरीकडे मुन्ना बजरंगीची बागपत जेलमध्ये हत्या करण्यात आली होती. मुन्ना बजरंगीच्या हत्येनंतर विश्वास भारतात येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण गुन्हेगारी क्षेत्रात मोठी जागा रिकामी झाली.

10 वर्षांनंतर विश्वास नेपाळीचे नाव पुढे आले : सुमारे वर्षभरापूर्वी अचानक वाराणसीत विश्वास नेपाळी याचे नाव पुन्हा गुंजले. प्रत्यक्षात, चेतगंज परिसरात ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याच्या कार्यालयात हेल्मेट घालून आलेल्या एका बदमाशाने शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागितली आणि भैय्या जी सांगतोय ते करा, अन्यथा परिणाम फार वाईट होईल, अशी धमकी दिली. यानंतर विश्वास नेपाळीच्या नावाने तीन ते चार वेळा फोन कॉल आणि टेक्स्ट मेसेजद्वारे वाहतूकदाराकडून 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. क्राईम ब्रँचनेही ज्या नंबरवरून कॉल आला तो नंबर घेऊन तपास केला पण यश आले नाही. खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यासह अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला विश्वास शर्मा उर्फ ​​विश्वास नेपाळी हा गेल्या १३ वर्षांपासून फरार आहे. वाराणसी पोलिसांनी त्याच्यावर 50 हजारांचे बक्षीसही जाहीर केले आहे. तरीही पोलिसांचे हात रिकामेच आहेत. पकडणे तर दूरच, या नेपाळीबद्दल कोणतीही माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. वाराणसीमध्ये पुन्हा एकदा जिवंत असलेल्या नेपाळीच्या नावाने पोलिसांचे कान उभे राहिल्याने व्यावसायिकांच्या हृदयाचे ठोकेही वाढले आहेत.

हेही वाचा : अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी, एकाची गळा चरून हत्या केल्याचे उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.