ETV Bharat / bharat

Minor Girl Raped In Madarsa : मदरशातील बालिकेवर मौलानाचा अत्याचार; विरोध केल्याने पीडितेला मारहाण, नराधमाविरोधात गुन्हा दाखल - बालिकेवर अत्याचार

हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील शामली येथे मदरशात शिकणाऱ्या बालिकेवर मौलानाने अत्याचार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मौलानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही पीडिता उत्तर प्रदेशातील आहे. मात्र, शिक्षणासाठी ती शामली येथील मदरशात दाखल झाली होती.

Minor Girl Raped In Madarsa
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 10, 2023, 11:22 AM IST

Updated : Aug 10, 2023, 11:56 AM IST

चंदीगड : मदरशात शिक्षण घेणाऱ्या बालिकेवर मौलानाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना करनाल जिल्ह्यातील शामली शहरात घडली आहे. या नराधमाने मदरशात शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. पीडितेच्या आरोपानंतर 'बाल कल्याण समिती'ने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पीडितेची वैद्यकीय तपासणी केली.

'बाल कल्याण समिती'च्या माध्यमातून मदरशात शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. आम्ही शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करुन प्रकरण पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे. प्रकरण उत्तर प्रदेशातील पोलीस ठाण्याचे आहे, त्यामुळे पुढील कारवाई त्यांच्याकडून लगेच करण्यात येईल. - सुरेश कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक, करनाल

शामलीतील मदरशात 20 जूनला गेली होती पीडिता : उत्तर प्रदेशातील ही बालिका 20 जूनला करनाल जिल्ह्यातील शामली येथील मदरशात शिकण्यासाठी गेली होती. यावेळी दहा दिवस झाल्यानंतर मदरशातील मौलानाने तिला आपल्या जवळ बोलावून आक्षेपार्ह कृत्य केले. मात्र याला पीडितेने विरोध केल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर या नराधमाने पीडितेवर चार ते पाच तास अत्याचार केल्याची माहिती पीडितेने बाल कल्याण समितीला दिल्याचे बालिकेच्या नातेवाईकांनी सांगितले.

पीडितेची मदरशातून बाहेर पडण्यासाठी धडपड : मदरशात शिक्षणासाठी दाखल झालेल्या पीडितेसोबत मौलानाने आक्षेपार्ह कृत्य सुरु केल्यानंतर पीडिता प्रचंड घाबरली होती. ती मदरशातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होती. मात्र मौलाना तिला मदरशाबाहेर पडू देत नव्हता, अशी माहिती पीडितेच्या नातेवाईकांनी दिली. त्यानंतर एक दिवस मौलानाने पीडितेला आपल्या खोलीत बोलावून अत्याचार केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला.

बाल कल्याण समिती घटनास्थळी : शामली येथील मदरशात शिकणाऱ्या बालिकेवर मौलानाने अत्याचार केल्याची घटना पीडितेच्या नातेवाईकांनी 'बाल कल्याण समिती'ला दिली. त्यामुळे समितीच्या पथकाने तत्काळ मदरसा गाठत पीडितेची सुटका केली. 'बाल कल्याण समिती'ला पीडित बालिकेने 'आपबीती' कथन केली. त्यानंतर 'बाल कल्याण समिती'ने पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलीस ठाणे गाठत मौलानाविरोधात तक्रार दाखल केली. या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Tourist Girl Raped In Shimla : शिमला फिरायला गेलेल्या मुंबईतील अल्पवयीन तरुणीवर टॅक्सी चालकाचा बलात्कार
  2. Maulana Rapes Minor Girl : 60 वर्षीय मौलानाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक

Last Updated : Aug 10, 2023, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.