हमीरपुर Hamirpur Crime News : रथ कोतवालीच्या लीलावतीनगर पठाणपुरा परिसरात रविवारी (26 नोव्हेंबर) पहाटे धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून एका व्यक्तीनं चक्क त्याच्या पत्नीसह सासऱ्याचा खून केला. इतकचं नाही तर त्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, या प्रकरणानंतर नजीकच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कायम व्हायचे वाद : मिळालेल्या माहितीनुसार, मुस्करा पोलीस स्टेशन हद्दीतील पहारी भिटारी गावात राहणारे ओमप्रकाश राजपूत (42) हे त्यांची पत्नी अनुसुया (40), मुलगी केबीसी (17), जुली (12) आणि मुलगा प्रिन्स (10) यांच्यासोबत राहत होते. पती-पत्नीमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद व्हायचे. त्यामुळे पत्नी अनुसुया आपल्या तीन मुलांसह रथ कोतवाली परिसरातील लीलावती नगर पठाणपुरा परिसरात गेल्या पाच महिन्यांपासून राहायला गेल्या होत्या.
मुलीची प्रतिक्रिया : जीआरव्ही इंटर कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीत शिकणाऱ्या केबीसीनं सांगितलं की, मागील काही महिन्यापासून ती शहरातील लीलावती नगर पठाणपुरा येथे तिच्या आई अन् बहीण, भावासह राहते. काही दिवसांपूर्वीच लोदीपुरा येथे राहणारे त्यांचे आजोबा नंदकिशोर (वय 60) हे देखील त्यांच्या येथे राहण्यासाठी आले होते. शनिवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वडील ओमप्रकाश राजपूत यांचे मित्र रतनलाल वर्मा (वय 55,उच्च प्राथमिक शाळा भिटारीचे मुख्याध्यापक) हे घरी आले अन् तेथेच मुक्कामी थांबले, असं केबीसीनं सांगितलं.
पुढं ती म्हणाली की, मध्यरात्रीनंतर वडील ओमप्रकाश राजपूत भिंतीवर चढून घरात घुसले अन् आधी त्यांनी आई अनुसूया कॉटवर झोपलेली असताना तिला जिवंत जाळलं. आग लागताचं आई जोर-जोरात ओरडू लागली. यावेळी प्राचार्य रतनलाल वर्मांनी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यात तेही भाजले. आरडाओरडा ऐकून आजोबा धावत आले. तेव्हा वडिलांनी त्यांना जोऱ्यात धक्का दिला. त्यामुळं ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली.
मुलांनाही ठार करण्याचा प्रयत्न- ओम प्रकाशनं केबीसी आणि प्रिन्सचा गळा दाबून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांनीही त्याच्या हातून कशीबशी सुटका करत तेथून पळ काढला. यानंतर ओम प्रकाशनं पिस्तुलानं स्वत:च्या छातीवर गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेनं पहाटे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
हेही वाचा -