ETV Bharat / bharat

महिलेशी गैरवर्तणूक; मुख्यमंत्री योगी यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

author img

By

Published : Jul 9, 2021, 8:20 PM IST

महिलेशी गैरवर्तवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा अपक्ष आमदाराचा समर्थक असल्याचे बोलले जात आहेत. या प्रकरणात स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

महिलेशी गैरवर्तणूक
महिलेशी गैरवर्तणूक

लखनौ - स्थानिक निवडणुकीत नामनिर्देशित अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्या समाजवादी पक्षाच्या महिला नेत्याशी एका व्यक्तीने गैरवर्तवणूक केली. ही घटना लखीमपूर खेरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थानिक भागातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्कल अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे.

हेही वाचा-दिलासादायक! टीसीएस ४० हजार विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून देणार नोकऱ्या

कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश-

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही स्थितीत वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पोलिसांनी अधिक दक्ष व संवदेनशील राहण्याची सूचना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिली आहे.

भाजप कार्यकर्त्याने गैरवर्तवणूक केल्याचा आरोप

गैरवर्तवणुकीच्या प्रसंगाला सामोरे गेलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्या रितू सिंह म्हणाल्या, की भाजप कार्यकर्त्याने नामनिर्देशित अर्ज भरण्यापासून रोखले होते. तसेच त्याने हल्लाही केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते क्रांती कुमार सिंह म्हणाले, की ज्या वेळी घटना घडत होती, त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार रेखा वर्मा आणि भाजपचे आमदार लोकेंद्र प्रतास सिंह हेदेखील उपस्थित होते. ही घटना भाजपमुळेच घडल्याचा त्यांनी दावा केला.

हेही वाचा-तिरुमलाची स्पेशल दर्शनाची हजारो तिकीटे १० मिनिटांत बुक!

दरम्यान, महिला नेत्याशी गैरवर्तवणूक केल्याचा व्हिडिओ हा समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. या घटनेवरून समाजवादी पक्षाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा-प्रकृती अस्वस्थ सांगणाऱ्या प्रज्ञा सिंह यांच्या ठुमक्याचा व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.