नवी दिल्ली : 2020-21 मध्ये जेव्हा देश कोविड लॉकडाऊनमुळे ( Covid Lockdown India ) त्रस्त होता, तेव्हा देशभरातील ८५ हजारापेक्षा अधिक लोकांना असुरक्षित लैंगिक क्रियाकलापांमुळे ( Unprotected sex in Covid lockdown ) एचआयव्हीचा संसर्ग झाला ( AIDS Patients Increased Due To Unprotected Sex ) होता, असे एका आरटीआय माहितीनुसार ( Statistics of AIDS infected patients ) दिसून आले आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक ( Maharashtra ranks first in AIDS infection ) आहे.
लॉकडाऊन कालावधीत सर्वाधिक एचआयव्ही रुग्णांच्या यादीत महाराष्ट्रात १०४९८ प्रकरणे नोंदली गेली आहेत. या यादीत आंध्र प्रदेश ९,५२१ संसर्गांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक ८,९४७ आहे. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल अनुक्रमे 3,037 आणि 2,757 एचआयव्ही संसर्गासह यादीत चौथ्या आणि पाचव्या आहेत.
मध्य प्रदेशातील कार्यकर्ते चंद्र शेखर गौर यांनी दाखल केलेल्या आरटीआयला उत्तर देताना, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) ने माहिती दिली की, 2020-21 मध्ये देशभरात 85,268 HIV प्रकरणे असुरक्षित लैंगिक क्रियाकलापांमुळे नोंदवली गेली आहेत.
आकडेवारीनुसार, 2011-12 ते 2020-21 या कालावधीत असुरक्षित लैंगिक क्रियाकलापांमुळे नोंदवलेल्या HIV रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट दिसून आली. 2011-12 मधील 2.4 लाख एचआयव्ही रुग्णांची संख्या 2019-20 मध्ये 1.44 लाखांवर आली आणि 2020-21 मध्ये ती 85,268 वर घसरली.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम (NACP), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक विभाग म्हणून 1992 मध्ये भारतात HIV/AIDS च्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी एक व्यापक कार्यक्रम म्हणून सुरू करण्यात आला. एचआयव्ही संसर्गाचा प्रसार कमी करण्याच्या उद्देशाने याची अंमलबजावणी करण्यात आली होती. जेणेकरून देशातील विकृती, मृत्यू आणि एड्सचा प्रभाव कमी करता येईल. (ANI)
हेही वाचा : औरंगाबादमध्ये महिलेचे अपहरण, एड्स असल्याचे सांगताच बलात्काऱ्याने ठोकली धूम