नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार उन्मुक्त चंद ( Former captain Unmukt Chand ) याने आपले काही फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. 29 वर्षीय उन्मुक्तने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो अमेरिकेसाठी क्रिकेट खेळत आहे.
दरम्यान, उन्मुक्त चंद यांनी त्यांचे दोन फोटो ट्विटरवर शेअर केले ( Unmukt Chand shared photo ) आहेत. त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत ( Unmukt Chand eye injury ) झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे त्याचा डोळा वाचला आहे. काही अनुचित घटना घडली असती तर त्याची कारकीर्द उद्ध्वस्त होऊ शकली असती.
-
It’s never a smooth ride for an athlete. Some days you come home victorious, other days disappointed&there are some when you come home with bruises and dents.Grateful to God to have survived a possible disaster. Play hard but be safe. It’s a thin line.
— Unmukt Chand (@UnmuktChand9) October 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Thanku for the good wishes pic.twitter.com/HfW80lxG1c
">It’s never a smooth ride for an athlete. Some days you come home victorious, other days disappointed&there are some when you come home with bruises and dents.Grateful to God to have survived a possible disaster. Play hard but be safe. It’s a thin line.
— Unmukt Chand (@UnmuktChand9) October 1, 2022
Thanku for the good wishes pic.twitter.com/HfW80lxG1cIt’s never a smooth ride for an athlete. Some days you come home victorious, other days disappointed&there are some when you come home with bruises and dents.Grateful to God to have survived a possible disaster. Play hard but be safe. It’s a thin line.
— Unmukt Chand (@UnmuktChand9) October 1, 2022
Thanku for the good wishes pic.twitter.com/HfW80lxG1c
देवाने मोठ्या संकटातून वाचवले -
उन्मुक्त चंदला ही दुखापत कशामुळे झाली, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. या खेळाडूने फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, 'एथलीटसाठी रस्ता सोपा नसतो. कधी जिंकून परत येतो, तर कधी निराश होतो. परंतु काहीवेळा तुम्ही ओरखडे आणि जखमांसह घरी परतता ( Unmukt Chand eye injured in US ). मी देवाचा आभारी आहे, ज्याने मला मोठ्या दुर्दैवी संकटापासून वाचवले आहे.
उन्मुक्तने आपल्या पोस्टमध्ये खेळाडूंना खेळताना काळजी घेण्यास सांगितले आहे. त्याने पुढे लिहिले की, 'खूप खेळा, पण सुरक्षिततेची काळजी घ्या. दोघांमध्ये एक पातळ रेषा आहे. शुभेच्छांबद्दल धन्यवाद.' उन्मुक्त बिग बॅश लीग ( BBL ) खेळणारा पहिला भारतीय आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली 2012 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला -
उन्मुक्तने 2012 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपच्या ( Under 19 World Cup 2012 ) अंतिम सामन्यात नाबाद 111 धावांची खेळी करून भारतीय संघाला चॅम्पियन बनवले. त्याने भारत अ संघाचे नेतृत्वही केले होते. त्याने 2010 मध्ये दिल्लीतून आपल्या देशांतर्गत कारकिर्दीला सुरुवात केली आणि 8 हंगाम संघासाठी खेळला. यादरम्यान तो दिल्ली संघाचा कर्णधारही होता. नंतर तो उत्तराखंडकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळला.
भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकली नाही -
उन्मुक्त चंदने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये देखील भाग घेतला, जिथे त्याची कामगिरी खूपच निराशाजनक होती. त्याला आयपीएलच्या 21 सामन्यांत 15 च्या सरासरीने केवळ 300 धावा करता आल्या. 2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 30 जणांच्या भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. यासोबतच उन्मुक्तची 2014 टी-20 विश्वचषकासाठी 30 जणांच्या संघातही निवड करण्यात आली होती. मात्र त्याला वरिष्ठ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.