ETV Bharat / bharat

ऑक्सिजन मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडावर टाकली मांड; इंदूरच्या वृद्धाचा अजब जुगाड

या कोरोना काळात ऑक्सिजन पातळी कायम राखण्यासाठी रांजेंद्र पाटीदार यांनी २४ तास ऑक्सिजन उसर्जित करणाऱ्या पिंपळाच्या झाडाचा फायदा घ्यायला सुरुवात केली आहे. दिवसभरात पाटीदार यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पाटीदार पिंपळाच्या झाडावर चढून तिथेच खुर्ची टाकून बसतात.

author img

By

Published : May 15, 2021, 10:12 AM IST

Updated : May 15, 2021, 12:02 PM IST

पिंपळाच्या झाडावर टाकली मांड
पिंपळाच्या झाडावर टाकली मांड

इंदूर - कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची अत्यावश्यक गरज निर्माण झाली. देशात अनेक रुग्ण ऑक्सिजन अभावी मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मध्यप्रदेशातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या इंदूरमध्ये एका वृद्धाने ऑक्सिजन मिळवण्यासाठी चक्क पिंपळाच्या झाडावर आश्रय घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून त्यांनी स्वत:ची ऑक्सिजन पातळी कायम ठेवण्याचा एक रामबाण उपायच जनतेसमोर ठेवला आहे.

इंदूरमधील रंगवासा या गावातील राजेंद्र पाटीदार यांचे वय ६८ वर्ष आहे. या कोरोना काळात ऑक्सिजन पातळी कायम राखण्यासाठी रांजेंद्र पाटीदार यांनी २४ तास ऑक्सिजन उसर्जित करणाऱ्या पिंपळाच्या झाडाचा फायदा घ्यायला सुरुवात केली आहे. दिवसभरात पाटीदार यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पाटीदार पिंपळाच्या झाडावर चढून तिथेच खुर्ची टाकून बसतात. या वयातही पाटीदार सहजपणे झाडावर चढतात आणि उतरतात. झाडावर बसलेल्या राजेंद्र पाटीदार यांचा नातू त्यांना काही आवश्यक असल्यास वस्तू पोहोच करतो.

पिंपळाच्या झाडावर टाकली मांड

राजेंद्र पाटीदार यांचा ऑक्सिजन लेव्हल ९९

शेती व्यवसाय करणार राजेंद्र पाटीदार यांच्या घराशेजारीच ३ पिंपळाची झाडे आहेत. त्यातील एक त्यांच्या घराला चिटकूनच आहे. रुग्णालयात कोरोना रुग्ण ऑक्सिजनच्या तुटवड्याने मरत असल्याच्या बातम्या ज्यावेळी पाटीदार यांच्या ऐकण्यात आल्या, त्यानंतर त्यांनी २४ तास ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पिंपळ वृक्षाच्या सानिध्यात राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या १५ ते २० दिवसांपासून त्यांचा अधिवास हा पिंपळ वृक्षाच्या सानिध्यात आहे. राजेंद्र सांगतात की मी पिंपळाच्या झाडावर बसत असल्यानेच आज माझी ऑक्सिजन लेव्हल (spo2) 99 वर स्थीर आहे. तसेच झाडावर चढ उतर केल्याने एक प्रकारे व्यायामही होत असल्याचे पाटीदार सांगतात.

कुटुंबाचेही सहकार्य -

दिवसभरात पाटीदार यांना केव्हाही झाडावर जावे असे वाटते, तेव्हा ते लगेच खुर्ची घेऊन झाडावर जाऊन बसतात. झाडावर बसल्याबसल्या ते शुद्ध ऑक्सिजन घेत, कपाल भाती, प्राणायाम आणि योगा करतात. गेल्या १५ ते २० दिवसांपासून त्यांचा हा नित्यक्रम झाला आहे. यासाठी पाटीदार यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यही मदत करतात. याचबरोबर पाटीदार यांचे सुदृढ आरोग्य पाहून गावकरीही त्यांच्या या पिंपळाच्या झाडाच्या सानिध्यात राहण्याचे कौतुक करतात.

अनेकांना प्रेरणा-

राजेंद्र पाटीदार यांच्याकडे कोणाला काही काम असेल आणि कोणी भेटण्यास आले तरी पाटीदार झाडावरून त्यांच्याशी संवाद साधतात. पिंपळाच्या सानिध्यात जे लोक राहतात त्यांच्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. तसेच या लोकांना कोरोनादेखील होणार नाही, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे ही प्रेरणा घेऊन त्यांच्या गावातील अनेक नागरिकांनी पिंपळाच्या सानिध्यात राहून स्वत:चा ऑक्सिजन लेव्हल स्थीर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

पिंपळाच्या झाडाचे फायदे-

  • श्वसनासंबंधित कोणत्याही समस्येमध्ये पिंपळाचे झाड उपयुक्त ठरते
  • पिंपळाच्या पानांचा उपयोग पोटांच्या विकारांवर औषध म्हणून केला जातो. पिंपळास पित्‍त नाशक म्हणूनही ओळखले जाते.
  • पिंपळापासून बनवलेल्या दंतमंजनाने दात घासल्यास दात आणि हिरड्या अधिक मजबूत होतात. तसेच दातातील इतर समस्याही नष्ट होतात.
  • त्वचारोगासंबंधीही पिंपळ उपयुक्त आहे. डाग, खाज सुटणे या सारख्या त्वचा रोगामध्ये पिंपळाची कोवळी पाने खाल्यास अथवा त्याचा काढा करून पिल्यास लाभ होतो.
  • शरीरावर एखादी जखम झाल्यास पिंपळाच्या पानांचा गरम लेप लावल्यास जखम बरी होण्यास मदत होते.
  • सर्दी-ताप अशा समस्यांमध्येही पिंपळ लाभदायक आहे
  • त्वचेचा रंग उजळवण्यासाठी देखील पिंपळाच्या सालीचा आणि पानांचा लेप उपयुक्त ठरतो. याशिवाय त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठीदेखील हे लाभदायक आहे.
  • पिंपळामध्ये अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असते. याची कोवळी पाने नियमतपणे चघळल्यास थकवा जाणवत नाही. तसेच वाढत्या वयानुसार जाणवणाऱ्या समस्याही कमी होतात.
  • नाकात फोड आल्यास पिंपळाच्या ताज्या पानांचा रस नाकात सोडल्यास आराम मिळतो. तसेच त्याचा वास घेणेही फायद्याचे ठरते.
  • टाचा उलल्या असतील तर, त्यावरदेखील पिंपळाच्या पानांचे दूध रामबाण उपाय ठरते. पिंपळाच्या पानांचे दूध टाचेला लावल्यास उललेल्या भेगा भरून निघतात.
  • काविळ झाल्यासही पिंपळाची 3-4 पानांच्या रस टाकून बनवेले शरबत पिल्यासही ते लाभदायी ठरते. सलग ४ ते ५ दिवस हा उपाय करावा लागतो.
  • पिंपळाच्या फळांचे चूर्ण देखील मधासोबत खाल्यास अडखळत बोलणाऱ्यास फायद्याचे ठरते आणि आवाजातही स्पष्टता येते.
  • टीप - पिंपळाचा औषध म्हणून वापर करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Last Updated : May 15, 2021, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.