बंगळुरु : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी हे गुरूवारी एका शहीद जवानाच्या ऐवजी एका जीवित जवानाच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी जवानांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि जमीन देण्याचेही आश्वासन दिले होते. हे सर्व स्थानिक नेत्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे झाले असे बोलले जात आहे.
जायचे होते हुतात्मा जवानाच्या घरी आणि पोहचले....!
केंद्रात नेमकेच मंत्री झालेले नारायणस्वामी हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यात 'जन आशीर्वाद यात्रा' करत आहेत. भाजपा सुत्रांच्या माहितीनुसार त्यांना पुण्यात एक वर्षापूर्वी शहीद झालेले बसवराज हिरेमठ यांच्या घरी जायचे होते. मात्र, कार्यकर्ते त्यांना रविकुमार कट्टीमनी या जीवित जवानाच्या घरी घेऊन गेले. कट्टीमनी हे सध्या जम्मू-कश्मिरमध्ये कार्यरत आहेत.
जवानाचे कुटुंबीय हैरान -
मंत्र्यांच्या यात्रा दौऱ्यानुसार, त्यांना शहीद जवानाच्या परिवाराला भेटायचे होते आणि सांत्वना द्यायची होती. मात्र, नारायणस्वामी हे खासदार शिवकुमार उदासी यांच्यासोबत जिल्ह्यातील मुलागुंड येथे उशिरा पोहोचले आणि त्यातच त्यांना कट्टीमनी यांच्या घरी नेण्यात आले, या सर्व प्रकाराने जवानाच्या घरचे ही हैरान झाले होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
गोंधळ लक्षात आल्यावर केली सारवासारव -
भेटी दरम्यान, जेव्हा मंत्र्यांनी जवानाच्या परिवारला सरकारी नोकरी आणि जमीन देण्याचे आश्वासन दिले, त्यावेळी जवानाच्या घरच्यांना धक्काच बसला. त्यानंतर एका स्थानिक भाजपा कार्यकर्त्याने कट्टीमनी यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांचे बोलने मंत्र्यासोबत करून दिले. नारायणस्वामी यांना जेव्हा त्यांची चुकी लक्षात आली तेव्हा त्यांनी प्रकरणाची सावरासारव करून जवानाची प्रशंसा करून त्यांच्या परिवाराला सन्मानित केले आहे. तसेच त्यांनी स्थानिक नेत्यांवर नाराजीही व्यक्त केली आहे.
हुतात्मा जवानाच्या घरी जाण्याचा दौरा रद्द -
दरम्यान, मंत्र्यांनी शहीद जवान हिरेमठ यांच्या घरचा दौरा रद्द केला. याप्रकरणी शहीद जवानाच्या आईने सांगितले की, 'कोणीही आमच्या घरी आलेले नाही. मला सांगितले होते की तुम्हाला भेटण्यासाठी मंत्री येणार होते. मात्र, ते एका जीवित जवानाच्या घरी गेले होते. मला तर माझा मुलगा वापस हवा आहे.' असे भावूक उद्गार हुतात्मा जवानाच्या आईने काढले आहेत.
हेही वाचा - मुंबईतील दोन चिमुकलींना हवे आहे 16 कोटींचे इंजेक्शन, मुलींच्या वडीलांनी केले मदतीचे आवाहन