लखीमपूर खेरी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी Union Minister of State for Home Affairs Ajay Mishra Teni यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टेनी व्हिडिओमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांना दो कौड़ी का आदमी म्हणताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, व्हिडिओमध्ये टेनी म्हणतात, मी राकेश टिकैत यांना चांगले ओळखतो. दो कौड़ी का आदमी है. दोनदा निवडणूक लढवली, दोन्ही वेळा जमानत जप्त झाली. अशा व्यक्तीने कोणाचा विरोध केला तरी त्याने काहीही फरक पडत नाही.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी Union Minister of State for Home Affairs Ajay Mishra Teni हे राकेश टिकैत यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. अजय मिश्रा टेनी म्हणाले की, हत्ती चालत राहतो आणि कुत्रे भुंकत राहतात. समजा मी ट्रेनने लखनौला वेगाने जात आहे. मी माझ्या ध्येयाकडे वेगाने धावत आहे आणि काही कुत्रे गाडीच्या मागे धावू लागले. काही कुत्रे भुंकायला लागतात. त्यामुळे काही फरक पडत नाही.
टेनी यांनी टिकैतवर आरोप केले आणि त्यांचा उदरनिर्वाह वादातूनच चालतो असे सांगितले. दरम्यान टेनी यांनी आपण आजपर्यंत कोणतीही चूक केली नसल्याचा दावा केला. त्याचवेळी अजय मिश्रा टेनी म्हणाले की, अशा व्यक्तीने कोणाचा विरोध केला तर त्याला काही अर्थ नाही. म्हणूनच मी अशा लोकांना उत्तरही देत नाही. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी लखीमपूर कार्यालयात त्यांच्या समर्थकांमध्ये हे वक्तव्य केले.
हेही वाचा Ashish Mishra : जेलवारी! लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रा पुन्हा तुरुंगात