ETV Bharat / bharat

विमानात रुग्णाचे प्राण वाचविल्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, की मी चाळीस वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम केले आहे. त्यामुळे रुग्णसेवा माझ्या रक्तातच आहे. तो रुग्ण आजारी पडला होता. तेव्हा एअर होस्टेसने मदतीची विनंती केली. तेव्हा मी माझे मंत्रीपण विसरून डॉक्टरच्या भूमिकेत शिरून त्या रुग्णावर उपचार केले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

author img

By

Published : Nov 17, 2021, 9:11 PM IST

पणजी - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Union Minister of State Dr Bhagwat Karad) यांनी इंडिगो विमानात एका प्रवाशावर उपचार करून त्याचे प्राण वाचविले होते. त्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री कराड यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने खास चर्चा केली.

मंगळवारी दिल्लीहून मुंबईच्या दिशेने इंडिगो कंपनीचे फ्लाईट 171 (indigo 171 plane flight) उड्डाण करण्यासाठी झेपावले होते. प्रवासात एका रुग्णाला रात्री दोन वाजता रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. तेव्हा एअर होस्टेसने त्या रुग्णाच्या उपचारासाठी विमानातच कोणी डॉक्टर आहे का, अशी विचारणा केली. त्याचवेळी या विमानातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr Bhagwat Karad) प्रवास करत होते. यावेळी त्यांनी पुढे येऊन त्या रुग्णावर उपचार करत त्याला जीवनदान दिले. (Dr Bhagwat Karad saved life of passenger in Plane) याच विषयावर बातचीत ईटीव्ही शी बातचीत करताना त्यांनी सांगितले की मी चाळीस वर्षे रुग्णसेवा केली आहे. मी आधी डॉक्टर व मगच मंत्री असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

हेही वाचा-केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानात केले प्रवाशावर उपचार, जीव वाचला

रुग्णसेवा करणे हे माझे कर्तव्य आहे- डॉ कराड
पुढे कराड म्हणाले, की मी चाळीस वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम (Dr Bhagwat Karad 40 years medical practice) केले आहे. त्यामुळे रुग्णसेवा माझ्या रक्तातच आहे. तो रुग्ण आजारी पडला होता. तेव्हा एअर होस्टेसने मदतीची विनंती केली. तेव्हा मी माझे मंत्रीपण विसरून डॉक्टरच्या भूमिकेत शिरून त्या रुग्णावर उपचार केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अशाप्रकारे जनतेची सेवा करायला मिळणे, हे आम्ही आमचे भाग्य समजत आहोत.

हेही वाचा-"देशाची अर्थव्यवस्था भक्कम" केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची EXCLUSIVE मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.