ETV Bharat / bharat

Nitin Gadkari Gorakhpur : नितीन गडकरी देणार दहा हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पांची भेट! - पूर्वांचलमधील रस्त्यांचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज उत्तर प्रदेशात दहा हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित राहणार आहेत.

Nitin Gadkari
नितीन गडकरी
author img

By

Published : Mar 13, 2023, 9:58 AM IST

गोरखपूर (उ. प्रदेश) : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवारी उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमधील अनेक रस्त्यांच्या पायाभरणी आणि उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दरम्यान ते सुमारे दहा हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. गोरखपूरच्या महंत दिग्विजय नाथ पार्कमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती : यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय केंद्रीय रस्ते व वाहतूक राज्यमंत्री निवृत्त जनरल व्ही.के.सिंह, उत्तर प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जितिन प्रसाद यांच्यासह ५० हून अधिक खासदार, मंत्री आणि आमदार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. गडकरी 11.15 वाजता दिल्लीहून निघून 12:30 वाजता गोरखपूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. येथून दुपारी अडीच वाजता ते मध्य प्रदेशातील खजुराहो येथे पोहोचतील.

५७० कोटी रुपये खर्चाची कामे : सोमवारी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोरखपूरला जोडलेल्या ५७० कोटी रुपये खर्चाच्या चार चौपदरी रस्त्यांची पायाभरणी होणार आहे. एनएचएआय तर्फे आयोजित पायाभरणी योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी जंगल कौरिया - सोनौली, जंगल कौरिया - जगदीशपूर (गोरखपूर रिंगरोड बायपास), रामजानकी मार्ग, महाराजगंज - निचलौल - थूठीबारी रस्त्याच्या चौपदरीकरणाची पायाभरणी करतील. याशिवाय ते हादिया क्रॉसरोड ते करमाईनी घाट ते टूलेन हा रस्ता, बलरामपूर बायपास दुपदरी रस्ता, बरहालगंज - मेहराना घाट दुपदरी रस्ता, छपिया - सिक्रीगंज दुपदरी रस्ता, गोरखपूर - आनंद नगर रेल्वे विभागावर रोड ओव्हरब्रिजचे बांधकाम आणि महाराजगंज - निचलौल - थूठीबारी दुपदरी रस्त्याची पायाभरणी करतील.

या रस्त्यांचे उद्घाटन : नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असलेल्या प्रकल्पांमध्ये जंगल कौरिया - मोहद्दीपूर विभागातील चौपदरी रस्त्याचा समावेश आहे. त्याची एकूण लांबी 18 किलोमीटर असून त्याची किंमत 323 कोटी रुपये आहे. तसेच कॅन्टोन्मेंट - छापिया रस्त्याची एकूण लांबी 55 किलोमीटर असून त्याची किंमत 281 कोटी रुपये आहे. याचेही उद्घाटन मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. भाव बारी ते पटवळ या 26 किमी रस्त्याचा खर्च 94 कोटी रुपये, बंगाली टोला ते बनराहा पुरब पट्टी या 19 किमीच्या रस्त्याचा खर्च 70 कोटी रुपये, कुई बाजार ते गोला या 9 किमीचा रस्त्याचा खर्च 38 कोटी रुपये आहे.

हेही वाचा : Adani Repays Loan : अदानीने केली 2 अब्ज डॉलर्सहून अधिक कर्जाची परतफेड, शेअर्स गहाण ठेऊन घेतले होते कर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.