ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर अन् अभिनेता राजपाल यादव यांची 'ईटीव्ही भारत'शी बातचीत - एमपी विधानसभा निवडणुका

ग्वाल्हेर येथील अंबाह येथे निवडणूक प्रचारात आलेल्या केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बातचित केली.

edited image
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Nov 1, 2020, 8:09 PM IST

Updated : Nov 2, 2020, 10:35 PM IST

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) - राज्यातील 28 विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोट निवडणुकीचा प्रचार आज (दि. 1 नोव्हेंबर) थंडावला आहे. पोटनिवडणुकीत सर्वाधिक 16 जागा ग्वाल्हेर, चंबल अंचल येथील आहेत. या ठिकाणी भाजप पूर्ण ताकद लावत आहे. दरम्यान आज अंचल येथे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवने रोड शो करत भाजपला मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. यावेळी बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.

बातचित करताना

केंद्रीय मंत्री यांनी 'ईटीव्ही भारत'शी साधला संवाद

केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधत म्हटले की, आज (दि. 1 नोव्हेंबर) प्रचार-प्रसारासाठीचा अंतिम दिवस होता. यासाठी अंबाह विधानसभा मतदारसंघात रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या पोटनिवडणूकीत भाजपच्या सर्व जागा निश्चित निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजपाल यादव यांनी 'ईटीव्ही भारत'शी केली बातचित

बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव यांनीही 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर माझे वडील बंधू आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांसाठी मी प्रचारात सहभागी झालो आहे. त्यांना राजकारणातील एन्ट्रीबाबत विचारले असता ते म्हणाले, मी आज नाही तर मागील दहा वर्षांपासून राजकारणात आहे.

दहा नोव्हेंबरला लागणार निकाल

मध्यप्रदेश येथील 28 जागांच्या पोट निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या आहेत. तीन नोव्हेंबरला यासाठी मतदान होणार असून दहा नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

हेही वाचा - शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ सरकार पाडून सत्तेत येणाचा प्रयत्न केला- सचिन पायलट

Last Updated : Nov 2, 2020, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.