ETV Bharat / bharat

Amit Shah In Hyderabad : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हैदराबाद दौऱ्यावर; 54 वा सीआयएसएफ स्थापना दिवशी परेडमध्ये उपस्थित

54 वा सीआयएसएफ स्थापना दिवस साजरा करण्यात आला. दिल्लीबाहेर सीआयएसएफ स्थापना दिवस आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. मोदी सरकारचे दहशतवादाबाबत असहिष्णुतेचे धोरण आगामी काळातही कायम राहील आणि त्यांचा नायनाट करण्याची भूमिका सर्वोपरी राहिल असे त्यांनी सांगितले.

Union Home Minister Amit Shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
author img

By

Published : Mar 12, 2023, 11:43 AM IST

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी हैदराबादमध्ये 54 व्या सीआयएसएफ स्थापना दिवस परेडला उपस्थित राहत आहेत. हैदराबादमध्ये प्रथमच रायझिंग डे परेड हा आयोजित केला जात आहे. भारत येत्या काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर उभारी घेईल आणि त्याच्या अर्थव्यवस्थेचा आकारही वाढेल, देशाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक शक्तीचे महत्त्व अधोरेखित करत शाह म्हणाले.

5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे व्हिजन : या कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे व्हिजन मांडले आहे. यामुळे बंदरे, विमानतळ आणि इतर सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या सुरक्षेची आवश्यकता असेल. त्यांच्या रक्षणासाठी सीआयएसएफची भूमिका सर्वोपरी आहे. यासाठी, पायाभूत सुविधा प्रकल्पांचे संरक्षण करण्यासाठी गृह मंत्रालय हे आगामी काळात सीआयएसएफला सर्व तंत्रज्ञानाने बळकट केले.

भारताची अंतर्गत सुरक्षा नियंत्रणात : त्यांनी सीआयएसएफचे आभार मानत भारताची अंतर्गत सुरक्षा नियंत्रणात असल्याचे म्हटले. कर्तव्य बजावताना अनेक सीआयएसएफ जवानांनी आपले प्राण गमावले. मोदी सरकारचे दहशतवादाबाबत असहिष्णूतेचे धोरण आगामी काळातही कायम राहील, असेही अमित शाह म्हणाले. देशाच्या कोणत्याही भागात अलिप्ततावाद, दहशतवाद आणि देशविरोधी कारवाया असतील तर त्याचा कठोरपणे सामना केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुरक्षा आव्हानांचा ठामपणे सामना : मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांच्या सत्तेत सुरक्षा आव्हानांचा ठामपणे सामना केला. शाह म्हणाले की, काश्मीरमधील हिंसाचार कमी होत आहे. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावित प्रदेशांमध्ये बंडखोरी कमी झाली आहे. अमित शाह शनिवारी संध्याकाळी उशिरा शहरात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीच्या बाहेरील सीआयएसएफ मैदानाबाहेर पहिल्यांदाच रायझिंग डे कार्यक्रम आयोजित केला जात आहे. नॅशनल इंडस्ट्रियल सिक्युरिटी अ‍ॅकॅडमी येथे हा सोहळा पार पडत आहे.

हेही वाचा : Karnataka Polls Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर, बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वेच्या 118 किलोमीटर लांबी रस्त्याचे उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.