नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याची अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सुरुवातीला 8 जुलैला सायंकाळी विस्तार होणार असल्याची चर्चा होती. सुत्राच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला सायंकाळी होण्याची शक्यता आहे.
देशातील भाजपच्या सर्व खासदारांना दिल्लीत हजर होण्याचे आदेश भाजपने दिले आहेत. मात्र, अद्याप, सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याची अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
-
#UPDATE | Union Cabinet reshuffle likely to take place tomorrow evening.
— ANI (@ANI) July 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE | Union Cabinet reshuffle likely to take place tomorrow evening.
— ANI (@ANI) July 6, 2021#UPDATE | Union Cabinet reshuffle likely to take place tomorrow evening.
— ANI (@ANI) July 6, 2021
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ते आज सायंकाळी नवी दिल्लीत परतणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या मंत्र्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, त्यांना दिल्लीत येण्यासाठी फोन करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. ज्योतिरादित्य सिंदिया यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी या राज्यांचे राज्यपाल बदलले, गोव्यातही झाला बदल
मुख्यमंत्री नारायण राणे यांना दिल्लीत बोलाविले!
मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या कार्यालयातून नारायण राणे यांना दिल्लीला बोलावण्यासंदर्भात फोन आला असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे नारायण राणे यांचे केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपासूनच नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपद मिळण्याच्या चर्चेला उधाण आले होते. महाराष्ट्रातून दोन नेत्यांना मंत्री पद दिले जाणार असल्याच्या चर्चा आहे. यामध्ये खासदार नारायण राणे, खासदार हिना गावित, खासदार प्रीतम मुंडे आणि खासदार पूनम महाजन यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र आद्यप नारायण राणे यांनाच दिल्लीतून फोन आल्याची माहिती समोर येत आहे.
यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची शक्यता-
माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती पारस, राजदचे नेते आर. सी. पी. सिंह आणि राजीव रंजन हे दिल्लीत पोहोचणार आहेत. अपना दलचे प्रमुख अनुप्रिया पटेल या मोदी सरकारमध्ये सहभागी होत्या. त्यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
सुत्राच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळात २५ जणांचा समावेश होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ समावेश होण्यापूर्वी त्यांच्या पार्श्वभूमीबाबत भाजपकडून जाणून घेतली जाणार आहे.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाचा ७ जुलैला विस्तार; महाराष्ट्रातून कोणाला मिळणार मंत्रिपद?
यामुळे होणार केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार
लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान आणि कर्नाटकचे भाजपचे नेते सुरेश अनगडी यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याने रिक्त झालेल्या मंत्र्यांच्या जागा सरकारला भराव्या लागणार आहेत.