ETV Bharat / bharat

Budget 2023 Highlights : बजेटमधून कुणाला काय मिळाले? वाचा, A to Z माहिती - निर्मला सीतारामण अर्थसंकल्प 2023 सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामण यांनी आज(1 फेब्रुवारी) संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर केला आहे. यात विविध नवीन योजनांची माहिती यावेळी सीतारामण यांनी दिली. तसेच टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. याबरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी बचत योजनांची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 1, 2023, 4:37 PM IST

Updated : Feb 1, 2023, 4:55 PM IST

नवी दिल्ली - निर्मला सीतारामण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सीतारामण यांनी परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी आणखी बळ दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच कृषी, संरक्षण, शिक्षा, महिला या क्षेत्रांसाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.

union budget 2023
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
  1. टॅक्स स्लॅबमध्ये बदल - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता, करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.
    union budget 2023
    अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
  2. महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना - महिला व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणाऱ्या दोन योजना 2023 च्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक सध्या कमाल 15 लाख रुपये जमा करू शकतात. ही मर्यादा 30 लाख रुपये करण्यात येणार आहे. महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा केली, दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येणार आहे. दोन लाखापर्यंतची रक्कम ठेवता येईल. 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.
    union budget 2023
    अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
  3. कृषी क्षेत्र - अर्थसंकल्पाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता कायम आहे. आजच्या अर्थसंकल्पात सरकारने त्यांच्यासाठी किती दिलासा दिला हे जाणून घेण्यास शेतकरी उत्सुक आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला आहे. आणि अर्थसंकल्पाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना अनेक गोष्टींसाठी दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
    union budget 2023
    अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
  4. शिक्षण क्षेत्र - गेल्या वर्षी प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया योजनेची सुरूवात केली. 14500 शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार अहेत. पुढील तीन वर्षात 3.5 लाख अदिवासी विद्यार्थांना सेवा देणाऱ्या 740 एकलव्य शाळांसाठी एकूण 38,800 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती करेल. जागतिक विद्यापीठ क्रमवारीत 71 नवीन विद्यापीठांचा समावेश करण्यात आला.
    union budget 2023
    अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
  5. रेल्वे क्षेत्र : निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की रेल्वेवर आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च केला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेला एकूण 2.4 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. हे आतापर्यंतचे सर्वाधिक वाटप आहे.
    union budget 2023
    अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
  6. आरोग्य क्षेत्र -2015 पासून स्थापन झालेल्या विद्यमान 157 वैद्यकीय महाविद्यालयांच्या सह-स्थानावर 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जातील, असेही त्या म्हणाल्या. 2014 पासून स्थापन झालेल्या विद्यमान 157 वैद्यकीय महाविद्यालयांच्या सह-स्थानावर 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जातील, सीतारामन म्हणाल्या. 2047 पर्यंत सिकलसेल ॲनिमिया दूर करण्याचे मिशन राबविण्याचीही सरकारची योजना आहे. वैद्यकीय संशोधनात, सर्व आयसीएमआर ( ICMR ) लॅबमध्ये सार्वजनिक आणि खाजगी वैद्यकीय सुविधांद्वारे संशोधनासाठी सुविधा असतील. सर्व सेंटर्स ऑफ एक्सलन्समध्ये फार्मास्युटिकल्समधील संशोधन आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम असतील.
    union budget 2023
    अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

हेही वाचा - Budget 2023 : 3 लाख रुपयांपर्यंत अजिबात टॅक्स नाही, करपात्र उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांवरुन 7 लाखावर

हेही वाचा - Budget 2023: अर्थसंकल्प २०२३.. काय स्वस्त, काय महाग.. पहा संपूर्ण यादी..

Last Updated : Feb 1, 2023, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.