ETV Bharat / bharat

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान, 'UNICEF' संस्थेनं दिला 'हा' इशारा - शाळा कधी सुरू होणार

गरीब कुटुंबातील मुलांवर शाळा बंद असल्याचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे. ही मुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाऊ शकतात. शाळेमध्ये त्यांना अन्न तसेच सुरक्षित वातावरण मिळते. मात्र, शाळा बंद असल्याने ही मुलं धोकादायक वातावरणात लोटली गेली आहेत, असे मत युनिसेफने व्यक्त केले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 9, 2020, 10:59 PM IST

हैदराबाद - यावर्षी मार्च महिन्यात जगभरात कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे संपूर्ण जगात टाळेबंदी लागू झाली. आता काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शाळा-महाविद्यालये अनेक देशांत अद्याप बंद आहेत. भारतातही हीच स्थिती आहे. अशा कठीण काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अगणित नुकसान होत आहे. शाळा पुन्हा सुरू करण्याला सर्व देशांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन युनिसेफने केले आहे.

विद्यार्थ्यांवर कोरोना महामारीचा परिणाम

जगभरात लाखो विद्यार्थ्यांवर शाळा बंदचा परिणाम झाला आहे. युनिस्कोने जमा केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यापेक्षा डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांवर शाळा बंदचा जास्त परिणाम झाला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकार शाळा महाविद्यालये बंद ठेवत असले तरी शैक्षणिकदृष्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनाची पहिली लाट मग दुसऱ्या लाटेत शाळा बंद राहिल्या. काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या मात्र, पुन्हा कोरोनाच्या भीतीने बंद केल्या.

मानसिक आरोग्यावर परिणाम

कोरोचा प्रसार शाळेतून होतो किंवा फैलावाचा मुख्य स्त्रोत शाळा नसल्याचे पुरावे समोर आले आहेत. मात्र, शाळा पूर्ववत सुरू करत असतानाच पुन्हा कोरोनाच्या भीतीने बंद करण्यात आल्या. अनेक देशात तर कोरोनाचा प्रभाव ठराविक भागात झाला किंवा नाही याची शहानिशा न करता सरसकट शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, मानसिक आरोग्यावर आणि एकंदरीत विकासावर वाईट परिणाम होत असल्याचे युनिस्कोच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

अनेक मुलं पुन्हा शाळेत न येण्याची भीती

गरीब कुटुंबातील मुलांवर शाळा बंद असल्याचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे. ही मुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाऊ शकतात. शाळेमध्ये त्यांना अन्न तसेच सुरक्षित वातावरण मिळते. मात्र, शाळा बंद असल्याने ही मुलं धोकादायक वातावरणात लोटली गेली आहेत. गरीब आणि कमी उत्पन्न गटातील ही मुले पुन्हा कधी शाळेत येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सुमारे ९ महिन्यांपेक्षा जास्त काळ मुले शाळेत गेलेली नाहीत. शाळा कोरोनापासून सुरक्षित ठेवून पुन्हा सुरू करण्याबाबात जास्त लक्ष दिले जात नाही, यावर युनिसेफने चिंता व्यक्त केली आहे. भविष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी शिक्षण क्षेत्राला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही युनिसेफने व्यक्त केले आहे.

व्यावसायिक शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज - युनिस्को

युनिस्कोने नुकतान २०२० साली भारतील शिक्षणाच्या स्थितीबाबत अहवाल सादर केला आहे. टेक्निकल आणि व्होकेशनल शिक्षणाची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी कौशल्याधारित मनुष्यबळाची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी मुलांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची गरज युनिस्कोने अधोरेखित केली आहे. न्याय पद्धतीनं सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारताला व्यावसायिक शिक्षणाची अंत्यत गरज आहे. स्किल इंडिया मिशनअंतर्गत भारत सरकार या दिशेने प्रयत्न करत आहे.

भारताने कोणत्या गोष्टींवर लक्ष देण्याची गरज

विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांना प्रशिक्षण, शिक्षण, अद्यायावत तंत्रज्ञान, कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. महिला, अपंग, मागास प्रवर्गातून येणाऱ्यांनाही व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध असाव्यात. व्यावसायिक शिक्षणाचे डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणात करावे. त्यामुळे सर्वांना शिक्षण सहज उपलब्ध होईल. २०३० च्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी अनुरुप उद्दिष्टयै ठरवावित. या क्षेत्रात सरकारने पैसाही उभारावा. योग्य नियोजनाच्या आधारे मनुष्यबळ विकसित करावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.