ETV Bharat / bharat

UNHCR REPORT : जगात शरणार्थ्यांची संख्या वाढली, 10 कोटी लोक विस्थापित - निर्वासित आकडेवारी यूएनएचआरसी

गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात सुरू असलेल्या युद्धाबरोबरच रशिया आणि युक्रेनमधील लढाईने आतापर्यंत 10 कोटी लोक आपले मूळ स्थान सोडून विस्थापित झाले आहेत.

unhcr report on refugees
निर्वासित आकडेवारी यूएनएचआरसी
author img

By

Published : May 24, 2022, 11:26 AM IST

नवी दिल्ली - कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे लोकं स्वतःच्या मर्जीने त्यांचे मूळ क्षेत्र सोडून विस्थापित होत नाही, परिस्थिती त्यांना त्यांच्या भूमीतून बाहेर काढते. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात सुरू असलेल्या युद्धाबरोबरच रशिया आणि युक्रेनमधील लढाईने आतापर्यंत 10 कोटी लोक आपले मूळ स्थान सोडून विस्थापित झाले आहेत.

हेही वाचा - सुरतच्या पाच जणांनी बनवले सौरउर्जेवर चालणारे जलशुद्धीकरण यंत्र, राजस्थानच्या 700 गावांना मिळणार शुद्ध पाणी

आजपर्यंतच्या इतिहासात ही संख्या एक विक्रम आहे. युनायटेड नेशन्स हाय कमिश्नर फॉर रिफ्युजी च्या अहवालानुसार, ही संख्या जगातील लोकसंख्येच्या 1 टक्क्यांहून अधिक आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) या जगातील आघाडीच्या थिंक टँकनेही सोमवारी एक अहवाल प्रसिद्ध केला. अचानक आलेल्या आव्हानांना आणि अनपेक्षित धोक्यांना सामोरे जाण्यात जग अपयशी ठरले आहे, असे त्यात सांगण्यात आले होते. यामुळे शांततेच्या प्रयत्नांना फटका बसला आहे. SIPRI च्या मते, पर्यावरणीय आणि सुरक्षा संकटे एकत्र येतात आणि तीव्र होतात, त्यांच्यापासून सुरक्षेसाठी उपाय करणे गरजेचे आहे.

विस्थापनाच्या इतिहासात पहिल्यांदाच 10 कोटी लोकांना आपला देश सोडावा लागला. या लोकसंख्येची तुलना केली तर एवढ्या लोकसंख्येने इजिप्तसारख्या नव्या देशाची स्थापना होऊ शकते. अजूनही विस्थापितांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे, असे युनायटेड नेशन्स हाय कमिश्नर फॉर रिफ्युजी (UNHCR) च्या अहवालात सांगण्यात आले आहे.

10 कोटींचा आकडा चिंताजनक आहे, तो मानवतेसाठी एक इशाराही आहे. विनाशकारी संघर्षांना थांबवण्याची, दडपशाही संपवण्याची आणि निरपराध लोकांना त्यांच्या घरातून पळून जाण्यास भाग पाडणाऱ्या कारणांचे समाधान शोधण्याची वेळ आली आहे, असे संयुक्त राष्ट्र निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त फिलिपो ग्रँडी म्हणाले. UNHCR च्या अहवालानुसार, 2021 च्या अखेरीस, इथियोपिया, बुर्किना फासो, म्यानमार, नायजेरिया, अफगाणिस्तान आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये लढाईमुळे विस्थापितांच्या संख्येने 9 कोटीचा आकडा ओलांडला होता.

SIPRI च्या अहवालानुसार 2010 मध्ये जगभरातील 30 देशांमध्ये सशस्त्र संघर्ष झाला होता. 2010 आणि 2020 दरम्यान, अशा संघर्षांची संख्या जवळपास दुप्पट होऊन 56 झाली. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढला. त्याचवेळी, विस्थापित लोकसंख्येची संख्या देखील दुप्पट झाली. 2020 मध्ये विस्थापित नागरिकांची संख्या 8 कोटी होती, जी 2010 मधील 41 दशलक्षांपेक्षा दुप्पट आहे.

हेही वाचा - मारहाण प्रकरणात आप आमदार, त्याची पत्नी आणि मुलाला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नंतर मिळाला जामीन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.